28 C
Mumbai
Saturday, June 29, 2024
Homeराजकीयपरमबीर सिंग फरार होण्यात केंद्राचा हात : नाना पटोले

परमबीर सिंग फरार होण्यात केंद्राचा हात : नाना पटोले

टीम लय भारी

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रावर गंभीर आरोप केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या फरार होण्यात केंद्राचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अनेक दिवसांपासून परमबीर सिंग हे अटकेच्या भीतीने गायब असल्याच्या चर्चा आहेत.याच पार्श्वभूमीवर पाटोले यांनी हे मोठे विधान केले आहे (Nana Patole targets central government).

खूप प्रयत्न करूनही परमबीर यांचा पत्ता पोलिसांना आणि तपास अधिकाऱ्यांना लागलेला नाही. त्यामुळे आमचा स्पष्ट आरोप आहे की, परमबीर यांना देशाबाहेर फरार करण्यामागे केंद्राचा हात आहे. असे विधान नाना पटोले यांनी केले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भाजप सरकार अपयशी ठरलं . याच मुद्यांपासून भरकटवण्यासाठी केंद्र सरकार ईडीचा वापर करत आहे.

मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या कार्यक्रमात केलेले विधान गंमतीत केले : नाना पाटोले

नाना पटोले गरजले, OBC आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत राज्यात निवडणुका घेण्यास केला विरोध

परमबीर सिंग हे त्यावेळी मुंबई पोलीस आयुक्त होते, त्यांच्यावर त्या काळातच कारवाई झाली असती तर हा जो घोटाळा बोलला जातोय त्याचा मुख्य उद्देश काय आहे ते समोर आले असते. मात्र आता राजकीय द्वेषापोटी महाराष्ट्रावर कारवाई केली जाते. तसेच हे सरकार डळमळीत करण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरु आहेत. असे म्हणत पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

मोदी सरकार जनतेला चिटकलेला ‘जळू’ : नाना पटोले

Modi government doing favouritism, not giving enough funds to Maharashtra: Nana Patole

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी