टीम लय भारी
रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वक्तव्यामुळे राणेंवर 23 ऑगस्ट रोजी कारवाई झाली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांची खंडित झालेली जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरु केली आहे. शिवसेनेने केलेल्या त्या कारवाईचा सुड घेण्यासाठी राणेंनी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. नारायण राणेला धमक्या देण्याचा प्रयत्न करू नका. थोडेथोडके नाही तर 39 वर्षे शिवसेनेने सोबत होतो. माझ्याकडेदेखील भरपूर मसाला आहे, असे बोलत शिवसेनेला राणेंनी धारेवर धरले आहे (Narayan Rane has taken the Shiv Sena by storm).
आपल्या भावाच्या पत्नीवर म्हणजेच वहिनीवर अॅसिड फेकायला कोणी सांगितले, कोणाला सांगितले? हेही मला माहित आहे. असा नाव न घेता गंभीर गौप्यस्फोट राणे यांनी केला आहे. ह्यांचे संस्कारच तसे आहेत. अशी अनेक प्रकरणे मला माहित आहेत. हळूहळू टप्प्या-टप्प्यात सगळे काही बाहेर काढेल. सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन यांच्या केस अद्याप संपलेल्या नाहीत. मी केंद्रात मंत्री आहे हे ध्यानात ठेवा. अशा कडक शब्दात शिवसेनेवर राणे कडाडले आहेत (Narayan Rane has slammed Shiv Sena).
नारायण राणेंना उद्धव ठाकरेंचा झटका
दरोडेखोराला अटक करतात तशी अटक मला केली : नारायण राणे
वरून सरदेसाई आमच्या घरासमोर येतो आणि हल्ला करतो. त्याला अजून ही अटक झालेली नाही. हेही माझ्या लक्षात आहे. सध्या आवाज बसला आहे. आवाज नीट झाला की पुन्हा एकदा मी खणखणीत वाजणार. असे बोलत राणेंनी ते पुन्हा काही तरी कडक बोलून, शिवसेनेने केलेल्या कृत्याचा बदला घेणार असा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री विलासराव देशमुख नारायण राणेंना म्हणाले होते, ‘नवी नवरी’
राणेंच्या या एवढ्यासगळ्या बोलण्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच धुमधडाका गाजवणार हे तर नक्की आहे.