27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयराज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा खोडसाळपणा, राष्ट्रवादीने फटकारले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा खोडसाळपणा, राष्ट्रवादीने फटकारले

टीम लय भारी

मुंबई:- राष्ट्रवादीने सध्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना धारेवर धरले आहे. राज्यपाल सतत राज्य सरकारच्या विरोधात काम करत आहेत. कोश्यारी यांच्या हिंगोली, परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. राज्यपाल हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाहीत तर ते राज्यपाल आहेत, हे त्यांनी समजून घ्यावे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे (Nawab Malik was attacked by Governor Bhagat Singh Koshyari).

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांच्या या दौऱ्यावरील सरकारची नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांचा हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये दौरा आहे. या तीन पैकी दोन जिल्ह्यात राज्यपाल विद्यापीठातील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. त्याला आमचा आक्षेप नाही. मात्र या तिन्ही जिल्ह्यात ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आढावा घेणार आहेत. त्याला आमचा विरोध आहे. हा सरकारच्या कामात हस्तक्षेप आहे. असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींनी इंधन दरवाढीविरोधात दिल्लीत काढली सायकल रॅली

शरद पवार दिल्लीत अमित शाहांची भेट घेणार

ही सरकारी कामात ढवळा ढवळ आहे

हिंगोलीतील जिल्हाधिकारी कार्यालयात एका कार्यक्रमाला राज्यपाल हजर राहणार आहेत. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. तसेच परभणीत दोन तास प्रशासनासोबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. राज्य सरकारला कोणतीही पूर्वसूचना न देता या बैठका होत आहेत. ही सरकारी कामात ढवळा ढवळ आहे. राज्यपालांकडून राज्यात सत्तेची दोन केंद्र असल्याचं भासवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे राज्याचे मुख्यसचिव राजभवनात जाऊन राज्यपालांच्या सचिवांना त्याबाबतच्या सूचना देतील, असे मलिक यांनी सांगितले (Nawab Malik said the governor was trying to pretend that there were two centers of power in the state).

Nawab Malik attacked Governor Bhagat Singh Koshyari
नवाब मलिक आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

चित्रा वाघ यांच्या विरोधात राष्ट्रवादी नेत्याने पोलिसांत केली तक्रार

NCP’s Nawab Malik opposes renaming of Mumbai airport

राज्यपाल हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते

राज्यपाल हे राज्य सरकारच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहे. या आधी राज्यपालांनी कोविड संदर्भात आढावा बैठका घेतल्या होत्या. त्यावेळी केंद्राकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर राज्यपालांनी या बैठका थांबवल्या होत्या. आता पुन्हा त्यांनी आढावा बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. राज्यपाल हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्यांना आपण आजही मुख्यमंत्री आहोत असे वाटते. त्यांना ते मुख्यमंत्री नाहीत हे समजावून सांगितलं जाईल, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले (Nawab Malik said the Governor was the Chief Minister of Uttarakhand).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी