27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयशरद पवार दिल्लीत अमित शाहांची भेट घेणार

शरद पवार दिल्लीत अमित शाहांची भेट घेणार

टीम लय भारी

नवी दिल्ली:- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पुन्हा एकदा दिल्ली गेले आहेत. दिल्लीत शरद पवार केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे नवे सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच या भेटीत राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, याच संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर हे देखील त्यांच्यासोबत असणार आहेत (Sharad Pawar to meet Amit Shah in Delhi).

शरद पवार हे आज मंगळवार (ता.3) संसदेत अमित शाहांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे 15 दिवसांपूर्वी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर आज ते अमित शाहांची भेट घेणार आहेत. अमित शाह हे देशाचे नवे सहकारमंत्री आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकाराच्या मुद्द्यांवर शरद पवार नव्या केंद्रीय सहकार मंत्र्यांना भेटणार आहेत. अमित शाहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची ही शरद पवारांची त्यांच्यासोबत पहिलीच भेट आहे.

Video : सांगलीत मुख्यमंत्री दौऱ्या दरम्यान भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडले

भारतीय पुरूष हॉकी संघाचा बेल्जिमकडून उपांत्य फेरीत पराभव

शरद पवार नरेंद्र मोदी भेट

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात 17 जुलैला पंतप्रधान कार्यालयात भेट झाली होती. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली होती. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आणि नव्या सहकार खात्याची निर्मिती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती.

Sharad Pawar to meet Amit Shah in Delhi
शरद पवार आणि अमित शाह

शरद पवार-नितीन गडकरी भेट

दरम्यान, शरद पवारांनी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. गेल्याच आठवड्यात नितीन गडकरी आणि शरद पवार यांचीही भेट झाली होती. नितीन गडकरी यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

चित्रा वाघ यांच्या विरोधात राष्ट्रवादी नेत्याने पोलिसांत केली तक्रार

NCP Chief Sharad Pawar Meets Amit Shah In Delhi, Two Weeks After Meeting PM Modi

शरद पवारांच्या दिल्लीतील भेटीगाठी

शरद पवारांनी गेल्या काही दिवसात, अल्पकाळात अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. शरद पवार हे 17 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटले होते. त्यानंतर वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती (In the last few days, I have met many leaders in a short period of time).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी