28 C
Mumbai
Saturday, June 29, 2024
Homeराजकीय'भास्कर जाधव; तुला मंत्री बनवत नाहीत, म्हणून तू भूंकत राहिलायस'

‘भास्कर जाधव; तुला मंत्री बनवत नाहीत, म्हणून तू भूंकत राहिलायस’

टीम लय भारी

मुंबई :- शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेवर आता निलेश राणे यांनी परखड शब्दांमध्ये भास्कर जाधवांना प्रत्युत्तर दिले आहे. “नारायण राणेंच्या मुलांसारखी मुले कुणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असेच प्रत्येक आई-बापाला वाटत असेल”, असे भास्कर जाधव म्हणाले होते. यावरून आता राणेपुत्र चांगलेच भडकले आहेत (Nilesh Rane is very angry with Bhaskar Jadhav statement).

“मदत मागायला आलेल्या महिलेला मारायला जाणाऱ्या भास्कर जाधव यांनी कुणाच्या संस्कृतीबद्दल बोलू नये”, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे. तसेच, 2024 च्या निवडणुकी दाखवून देऊ, असा इशारा देखील निलेश राणे यांनी दिला आहे.

माजी शाखा व्यवस्थापकाचा बँकेवर सशस्त्र दरोडा. एका महिलेचा मृत्यू

शिल्पा शेट्टी यांचा प्रसारमाध्यमांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

भाजपा नेते निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. आपल्या ट्वीटर अकाउंटवरून त्यांनी ट्वीट करत भास्कर जाधवांवर निशाणा साधला आहे. “भास्कर जाधव, तुमची औकात २०२४ ला दाखवून देऊ. वाळू चोर भास्कर जाधव, तुमच्यासारखे सतराशेसाठ जरी एकत्र आले, तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत. कुत्र्यासारखे भुंकत बसणे आणि समाजाला काही न देता नुसते रडत बसणे हे तुमचे राजकारण लवकरच संपणार”, असे निलेश राणे म्हणाले आहेत (Your politics will end soon said Nilesh Rane).

निलेश राणे आणि नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त भागाचा दौरा आणि महाविकासआघाडी सरकारवर सातत्याने ट्वीटरवरून टीका केली आहे. त्यासंदर्भात भास्कर जाधव यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना टीका केली होती. त्यावर बोलताना निलेश राणे ट्वीटमध्ये म्हणतात, “स्वत:च्या गावाच्या मंदिरात गावकऱ्यांना शिव्या घालणारे, मदत मागायला आलेल्या महिलेला मारायला जाणारे, स्वत:चा एकही रुपया चिपळूण शहराच्या विकासासाठी न वापरणारे भास्कर जाधव यांनी कुणाच्या संस्कृतीबद्दल बोलू नये, भास्कर जाधव यांनी एक वस्तू दाखवावी जी त्यांनी कोकणाला स्वखर्चातून दिली”, असे देखील निलेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहेत (This is also what Nilesh Rane has said in his tweet).

शिवसेनेने घेतला महत्वपूर्ण निर्णय, पुरग्रस्तांच्या मदतीसाठी संपुर्ण वेतन

Union Cabinet expansion: Narayan Rane gets charge of Ministry of Micro, Small and Medium Enterprises

Nilesh Rane is very angry with Bhaskar Jadhav statement
भास्कर जाधव आणि निलेश राणे

भास्कर जाधव काय म्हणाले?

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नारायण राणेंच्या मुलांवर भाष्य केलं आहे. राणेंवर टीका करताना भास्कर जाधव यांनी विधान केले की, नारायण राणे यांना सल्ला देऊन काही फायदा होणार नाही कारण म्हणजे त्यांच्या मुलांबाबत काय सांगावे, महाराष्ट्रात अशी मुले कोणाच्याही पोटी जन्माला येऊ नयेत, असे प्रत्येक आईबापाला वाटेल. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. अशा राज्यात आपण कोणाबाबत आणि कोणाच्या विरोधात कोणती भाषा वापरतो याचे जराही भान राखले जात नाही असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले आहे. भास्कर जाधवांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत (The repercussions of Bhaskar Jadhav statement are being felt).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी