29 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeराजकीयमुंबई महापालिकेचं डिपॉझिट तोडून शेतकऱ्यांना मदत द्या : नितेश राणे

मुंबई महापालिकेचं डिपॉझिट तोडून शेतकऱ्यांना मदत द्या : नितेश राणे

टीम लय भारी

मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेचे ८० हजार कोटींच्या ठेवी तोडून मदत करावी. असे विधान नितेश राणेंनी केले आहे (Nitesh Rane targets Chief Minister Uddhav Thackeray).

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. उद्धव ठाकरेंनी राज्याचे प्रमुख म्हणून केंद्राकडे काही मागण्यापेक्षा मुंबई महापालिकेकडे ८० हजार कोटींच्या ठेवी आहेत. त्या ठेवी तोडाव्यात असे आवाहन नितेश राणेंनी मुख्यमंत्र्याना केले आहे.

Nitesh Rane : नितेश राणेंना फडणवीस तुरूंगात टाकणार होते, पण…; शिवसेना खासदार राऊत यांचा गौप्यस्फोट

स्व. शिवसेनाप्रमुखांपेक्षा आताच्या पक्षप्रमुखांची शपथ घेतली असती… : नितेश राणे

त्याचबरोबर आता तुमची सत्ता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी मुख्यामंत्री असा निर्णय घेणार का? मुंबई महापालिकेचे ८० हजार कोटींचे डिपॉझिट तोडणार का? असा खोचक सवाल नितेश राणेंनी ठाकरेंना केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचा हेतू स्वच्छ असला पाहिजे असा टोलाही राणेंनी यावेळी लगावला आहे.

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे येणार एकाच मंचावर

Maharashtra government approves over Rs 138 crore aid for kin of police COVID martyrs: RTI

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यात पावसाच्या पाण्याने धुमाकूळ घातला आहे. नदी, नाले दुथडी वाहून वाहत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी