27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयअरेरे...! पंडीत नेहरूंनी एके काळी स्वतःचे घर पक्ष कार्यालयासाठी दिले, त्याच कार्यालयाचे...

अरेरे…! पंडीत नेहरूंनी एके काळी स्वतःचे घर पक्ष कार्यालयासाठी दिले, त्याच कार्यालयाचे वीज भरण्यासाठी पक्षासाठी पैसे नाहीत!

टीम लय भारी 

अलाहाबाद : देशातील प्रमुख महत्त्वाच्या राष्ट्रीय पक्षांमध्ये ‘काॅंग्रस’ची गणना होते, परंतु या पक्षाची स्थिती दिवसेंदिवस सगळ्याच बाबतीत ढासळत असल्याचे दिसून येत आहे.अलाहाबाद येथील काॅंग्रेसच्या कार्यालयाचे चक्क लाखो रुपयांचे वीज बील थकीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत शकील अख्तर यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून काॅंग्रेसची दुर्लक्षित परिस्थिती उघड केली आहे.

नवभारत टाईम्सचे ब्युरो चीफ शकील अख्तर यांनी प्रखरपणे काॅंग्रसची केविलवाणी परिस्थिती  येथे वर्णन केली आहे . अख्तर पोस्टमध्ये लिहितात, देशात हजारो काॅंग्रेस नेत्यांकडे बक्कळ पैसा आहे, युपी मध्ये सुद्धा काॅंग्रेस पक्षनेत्यांकडे करोडो रुपये आहेत, तरीसुद्धा खंत अशी की अलाहाबादचे काॅंग्रेस पार्टी ऑफिस काॅंग्रेसला लवकरत सोडावे लागणार आहे. एकेकाळी जे नेहरूंनी पार्टीसाठी दिले होते. त्यावर सहा लाख बारा हजार काय असतात असा प्रश्न करत या गंभीर दुर्लक्षिततेकडे अख्तर यांनी लक्ष वेधले आहे.

अलाहाबाद ऑफिसविषयी लिहिताना पत्रकार अख्तर म्हणतात, नेहरूंच्या पूर्वजांचे घर ‘आनंद भवन’ एके काळी नेहरूंनी पक्ष कार्यालयासाठी दिले, परंतु याच वास्तूचे वीज बिल वेळेत न भरल्यामुळे आता वीज कापण्यात आली आहे. वीज बील भरण्यासाठी कोर्टाने 15 जुलै पर्यंतचा वेळ दिला आहे.

अलाहाबाद शहर काॅंग्रेस कमिटीचे काय महत्त्व होते, भारत स्वातंत्र्यासाठी आणि काॅग्रेस निर्मिती मध्ये याचे काय योगदान आहे, हे आता सगळं सांगणं व्यर्थ आहे. कमला नेहरू काॅंग्रस कमिटीच्या पहिल्या अध्यक्षा होत्या. त्यानंतर तीन पंतप्रधान नेहरू, शास्त्री आणि इंदिरा अशा अनेक मोठे नेत्यांनी या वास्तूमध्ये बैठका घेतल्या आहेत. नेहरू आणि इंदिरा या अलाहाबाद शहर काॅंग्रेसचे तर अध्यक्षच होते,असे म्हणून थोडक्यात अख्तर यांनी काॅंग्रेस इतिहास सांगितला.

दरम्यान, लाखो रुपयांचे वीज बील भरण्याचे आव्हान अलाहाबाद काॅंग्रेस नेत्यांवर आहे याविषयी लिहिताना शकील अख्तर म्हणतात, आता कार्यालय वाचवण्यासाठी फंड गोळा करण्यात येत आहे. यामध्ये सगळ्यात जास्त फंड देणाऱ्या व्यक्तीविषयी माहिती समोर आली आहे. प्रमोद तिवारी यांनी 50 हजार दिले आहेत, तर उर्वरीत निधी हजार, पाचशे, शंभर, पन्नास असे गोळा करण्यात येत आहे.

या संपुर्ण पार्श्वभूमीवर काॅंग्रेसची परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न नकळतपणे अख्तर यांनी विचारला आहे. नेहरूंनी दिलेली वडिलोपार्जित वास्तू काॅंग्रेसला जपण्यात अपयश आल्याचे सुद्धा त्यांनी यातून म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा :

राज्याला ‘संवेदनशील‘ मुख्यमंत्री लाभला – प्रवीण दरेकर

बंडखोर सेना आमदाराला मुंबईत आल्यानंतर चार दिवसांनंतर दिसला मतदारसंघ!

फडणवीस-शिंदे भेटीचे गुपित मिसेस फडणवीसांनी केले उघड 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी