32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयकाँग्रेसला धनगरांबद्दल आसूया; कार्यकर्त्याला पद दिले, अन् एकाच दिवसांत काढून घेतले

काँग्रेसला धनगरांबद्दल आसूया; कार्यकर्त्याला पद दिले, अन् एकाच दिवसांत काढून घेतले

टीम लय भारी

मुंबई : साधारण चार वर्षांपूर्वी राहूल गांधी यांनी देशातील ओबीसी नेत्यांची एक बैठक घेतली होती ( Prithviraj Chavan against Rahul Gandhi ). महाराष्ट्रात ओबीसी नेतृत्वाला उत्तेजन देणार असा दृढनिश्चय राहूल गांधींनी हाताची मूठ टेबलावर आपटून केला होता.

पण राहूल गांधी यांच्या या धोरणाला महाराष्ट्रातील प्रस्थापित नेत्यांचा विरोध असल्याचे दिसत आहे. ओबीसीतील नेतृत्वाला पुढे येऊच द्यायचे नाही असा दृढनिश्चय या काँग्रेसी नेत्यांनी ( Congress leaders against OBC ) केला आहे.

नुकत्याच घडलेल्या एका संतापजनक उदाहरणातून महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांचा ढोंगी चेहरा समोर आला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने ही ढोंगबाजी समोर आली आहे ( Prithviraj Chavan is bogus leader ).

सातारा जिल्ह्यातील माण तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी दादासाहेब काळे या तरूणाची नियुक्ती केल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जारी केले होते ( Dadasaheb Kale was appointed congress president for Man taluka ). काळे हे युथ काँग्रेसचेही पदाधिकारी आहेत. गेली अनेक वर्षे ते पक्षात सक्रीय आहेत. धनगर आरक्षण कृती समितीमध्येही ते होते ( Prithviraj Chavan and congress leaders against Dhangar).

Prithviraj Chavan against Rahul Gandhi's policy
दादासाहेब काळे यांना नाना पटोले यांनी नियुक्तीपत्र दिले होते

दादासाहेब काळे यांना हे पद दिल्याने काँग्रेस पक्ष ओबीसी वर्गामध्ये पोचण्यामध्ये मदत होईल असा विचार नाना पटोले यांनी केला होता. त्या अनुषंगाने पटोले यांनी काळे यांनी माण तालुक्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचा लेखी आदेश जारी केला ( Nana Patole was issued order for Dadasaheb Kale ). पण पटोले यांच्या या निर्णयाला पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केला.

हलक्या कानाच्या पृथ्वीराज चव्हाणांनी नाना पटोले यांची भेट घेतली. साताऱ्यातील काँग्रेसचे पेटंट जणू आपल्याकडेच आहे, अशा तोऱ्यात त्यांनी पटोले यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला. एवढेच नव्हे तर, दादासाहेब काळे यांच्या नियुक्तीला स्थगिती देणारा आदेशही जारी करवून घेतला ( Prithviraj Chavan canceled Nana Patole’s order ).

या प्रकरणामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचा जातीयवादी चेहरा समोर आला आहे. पृथ्वीराज चव्हाण तसेच काँग्रेस पक्षाविषयी धनगर समाजातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

एका तालुक्याचे अध्यक्षपद देतानाही काँग्रेसचे नेते कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवित असल्याच्या भावना धनगर समाजातून व्यक्त करण्यात येत आहेत.

राहूल गांधींनी ओबीसीचा नारा का दिला होता ?

चार वर्षांपूर्वी राहूल गांधींनी ओबीसी नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीला विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे इत्यादी वरिष्ठ नेते उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

कॉंग्रेसच्या माण तालुकाध्यक्षपदी दादासाहेब काळे यांची नियुक्ती

धनगर आरक्षण कृती समितीचा ठराव : ठाकरे सरकारने केंद्राला आरक्षणाची शिफारस करावी, मोदी सरकारने ते अंमलात आणावे

देवरा, वासनिक, पृथ्वीराज चव्हाणांना लाज वाटायला हवी : केदार

राहूल गांधीने मोदी – शाहपे तंज कसा

महाराष्ट्रात भाजपने मोठी मुसंडी का मारली, व काँग्रेसची घसरण का झाली यावर या बैठकीत मंथन करण्यात आले. भाजपने ओबीसीतील माळी, धनगर व वंजारी ( माधव ) या मोठ्या लोकसंख्येच्या जातींना जवळ केले आहे. त्यांना मुबलक प्रतिनिधीत्व दिले आहे. या तिन्ही जातींच्या प्रश्नावर भाजप सतत चर्चा घडवून आणत असतो. त्यामुळे भाजप महाराष्ट्रात बळकट झाल्याचे राहूल गांधी यांच्या ध्यानी आणून देण्यात आले.

काँग्रेसमध्ये मात्र प्रस्थापित नेत्यांचेच वर्चस्व आहे. हे नेते इतर समाजातील नेत्यांना डोके वर काढू देत नाहीत, अशी चर्चा या बैठकीत झाली.

त्यावर महाराष्ट्रात ओबीसी नेतृत्वाला वाव देण्याची गरज असल्याची जाणीव राहूल गांधी यांना झाली. त्यांना ही गरज इतकी पटली की, त्यांनी मूठ आवळून टेबलवर जोरात आपटली, अन् महाराष्ट्रात ओबीसी नेतृत्व वाढविणार असा निश्चय व्यक्त केला. तशा सुचनाही त्यांनी तत्कालिन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना दिल्या ( Rahul Gandhi instructed to Ashok Chavan ). पण त्यावर काही अंमलबजावणी झालीच नाही. उलट दादासाहेब काळेंसारख्या सक्रीय कार्यकर्त्यांना चेपविण्याचे काम पृथ्वीराज चव्हाणांसारखे नेते करीत आहेत.

पृथ्वीराज चव्हाण म्हणजे काँग्रेससाठी अडचण

राजकारण्यांमधील सनदी अधिकारी अशी पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा आहे. चव्हाण हे इतर राजकीय नेत्यांना तुच्छ लेखतात. ओबीसी नेत्यांना तर ते जवळही उभे करीत नाहीत. मुख्यमंत्रीपदावर असताना त्यांचा राजेशाही थाट अनेकांनी अनुभवला.

पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचे अतोनात नुकसान करून ठेवले ( Prithviraj Chavan is harmful to Congress ). शरद पवार यांच्याशी पंगा घेतला. त्यामुळे सन 2014 मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी विधानसभेच्या स्वतंत्रपणे निवडणुका लढले ( Maharashtra Assembly Election 2014 ). पृथ्वीराज चव्हाण यांच्या ऐवजी अशोक चव्हाण, विलासराव देशमुख यांच्यासारखा नेता असता तर दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढविल्या असत्या व सत्तेत पुन्हा हे दोन्ही पक्ष आले असते.

हातात मुख्यमंत्रीपद असतानाही पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षावाढीसाठी काहीही केले नव्हते. कार्यकर्त्यांनाही त्यांनी बळकट केले नाही. आपल्याच मंत्र्यांच्या भ्रष्टाचाऱ्याच्या फायली पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना तयार करून ठेवल्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी तयार केलेल्या या फायलींचा वापर नंतर भाजपने सत्तेत आल्यानंतर केला.

अत्यंत कुचकामी असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने आता तरी महत्व द्यायला नको अशी भावनाही कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी