27 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeराजकीयमविआचे नेते व मंत्र्याकडून रेस ट्रॅकवर गाडी पार्किंगवरून प्रविण दरेकर यांची बोचरी...

मविआचे नेते व मंत्र्याकडून रेस ट्रॅकवर गाडी पार्किंगवरून प्रविण दरेकर यांची बोचरी टीका

टीम लय भारी

मुंबई :-  पुण्यातील बालवेड स्टेडियम रनिंग ट्रॅकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसवा शरद पवार आणि त्यांच्या मंत्र्यांनी गाड्या पार्क केल्या होत्या. राज्यातील क्रिडा संकुलांची देखभाल नीट करण्याची गरज असताना महाविकास आघाडी मधील नेते व मंत्री पुणे येथील शिवछत्रपति क्रिडा संकुलातील रेस ट्रॅकवर गाड्या उभ्या करून खेळाडूंच्या भविष्याचा ट्रॅक उद्ध्वस्त करत आहेत, त्यांची ही कृती निषेधार्ह आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली (Race Tracker Server Parking Type Pravin Darekar Visit Bochari Tika). 

पुण्यातील शिवछत्रपती क्रिडा संकुलात धावपटूंसाठी तयार केलेल्या रेस ट्रॅकवर व्हीव्हीआयपी गाड्या उभ्या करण्यावरुन भाजपकडून टीकेची झोड उठली आहे. त्यासंदर्भात प्रविण दरेकर म्हणाले की, राज्यात अगोदरपासूनच क्रीडा सुविधा कमी आहेत. त्यामुळे त्या ट्रॅकची नासधूस करू नये (Do not destroy the track).

शरद पवारांना सर्व फुकट पाहिजे; निलेश राणे

फडणवीसांच्या संन्यास घेण्याच्या वक्तव्यावरून मविआच्या नेत्यांची टोलेबाजी

रेस ट्रॅकवर व्हीव्हीआयपी गाड्या आणताना काळजी घेण्याची आवश्यकता होती. महाराष्ट्रात स्पोर्ट्सचे वैभव आहे. त्या ट्रॅकवर स्पर्धक ऑलिंपिकसाठी सराव करतात,  स्वतःचे आणि देशाचे भविष्य घडवत असतो.

Race Tracker Server Parking Type Pravin Darekar Tika
प्रविण दरेकर

कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून शरद पवार लवकरच घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Sharad Pawar under fire after cars in his convoy roll on to athletics track

महाविकास आघाडी सरकारकडून एक दीड वर्षात स्पोर्ट्सला चालना देण्यात आली नाही. ट्रॅकवरून गाड्या नेणे म्हणजे खेळाडूंसाठींच्या पवित्र वास्तुचा अवमान करण्यासारखे आहे. त्यामुळे यांचा मी निषेध व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली (I protest, said Pravin Darekar).

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी