29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयघराचा पत्ता लोक कल्याण मार्ग ठेवल्याने लोकांचे कल्याण होतं नाही :  राहुल...

घराचा पत्ता लोक कल्याण मार्ग ठेवल्याने लोकांचे कल्याण होतं नाही :  राहुल गांधी

टीम लय भारी

मुंबई: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) वरील व्याजदर ८.१ टक्क्यांपर्यंत आणल्याबद्द मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करुन असे म्हटलं की, लोक कल्याण मार्ग पत्ता ठेवून लोकांचे कल्याण होत नाही.या ट्विटमध्ये त्यांनी ईपीएफ ठेवींवर ८.१ टक्के व्याजदर केल्याने देशाती सुमारे  साडेसहा कोटी कर्मचाऱ्यांचे वर्तमान आणि भविष्य उद्ध्वस्त  असे म्हटले आहे. पंतप्रधानांनी ‘महागाई वाढवा, कमाई कमी करा’ हे मॉडेल लागू केले आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले.

राहुल गांधी यांनी काश्मिरी पंडितांच्या पलायनावर भाष्य केले आहे.  गेल्या महिन्याभरात अनेक काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या आहेत.राहुल गांधी यांनी ट्विट करुन असे म्हटले की, गेल्या 5 महिन्यांत काश्मीरमध्ये 15 सुरक्षा जवान शहीद झाले असून 18 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. काल एका शिक्षकाचाही मृत्यू झाला. काश्मिरी पंडित 18 दिवसांपासून संपावर आहेत. पण भाजप सत्तेची 8 वर्षे साजरी करत आहे. पंतप्रधान, हा चित्रपट नाही, हे आजचे काश्मीरचे वास्तव आहे.

हे सुद्धा वाचा: 

शिक्षकांच्या प्रशिक्षणात शिक्षण विभाग फेल, तांत्रिक अडचणीमुळे प्रशिक्षण स्थगित

Karnataka: Right-wing groups gather in Mandya for march to Srirangapatna mosque, prohibitory orders imposed

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी