28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeराजकीयमोदीजी, तुम्ही लोकशाहीची हत्या केली आहे! राहुल गांधींचा घणाघात

मोदीजी, तुम्ही लोकशाहीची हत्या केली आहे! राहुल गांधींचा घणाघात

किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने गुरुवारी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर छापा टाकला. यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. आता या प्रकरणावरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की, “शेतकऱ्यांनी एमएसपी मागितले तर त्यांना गोळ्या घ्याला – ही आहे मदर ऑफ डेमोक्रेसी? तरुणांनी नियुक्ती मागितली तर त्यांना ऐकायलाही नकार द्या – ही आहे मदर ऑफ डेमोक्रेसी? माजी राज्यपाल खरं बोलले तर त्यांच्या घरी सीबीआय पाठवा – ही आहे मदर ऑफ डेमोक्रेसी? प्रमुख विरोधी पक्षाचे बँक खाते गोठवा – ही आहे मदर ऑफ डेमोक्रेसी? कलम 144, इंटरनेट बंदी, तीक्ष्ण तारा, अश्रुधुराचे गोळे – ही आहे मदर ऑफ डेमोक्रेसी? मीडिया असो वा सोशल मीडिया, सत्याचा प्रत्येक आवाज दाबा – ही आहे मदर ऑफ डेमोक्रेसी? मोदीजी, तुम्ही लोकशाहीची हत्या केली आहे, हे जनतेला माहीत आहे आणि जनता त्याला उत्तर देईल!”

जम्मू-काश्मीरमधील किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची आणि कार्यालयाची झडती घेतली. त्याचबरोबर केंद्रीय एजन्सीने जम्मू-काश्मीरमधील 30 ठिकाणी छापे टाकले. यावर प्रतिक्रिया देताना सत्यपाल मलिक म्हणाले की, “मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी या छाप्यांना घाबरणार नाही. मी शेतकऱ्यांसोबत आहे.” ड्रायव्हर आणि सहाय्यक यांच्या घरावरही छापे टाकून त्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. सत्यपाल मलिक यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबत सांगितलं आहे.

मागील महिन्यातही सीबीआयने या प्रकरणाच्या सुरू असलेल्या तपासासंदर्भात दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमधील सुमारे 8 ठिकाणी छापे टाकले होते. या  छाप्यात 21 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम याव्यतिरिक्त डिजिटल उपकरणे, संगणक, मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली होती. तसेच, सीबीआयने चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स (प्रा.) लिमिटेडचे माजी अध्यक्ष नवीन कुमार चौधरी, माजी अधिकारी एमएस बाबू, एमके मित्तल आणि अरुण कुमार मिश्रा आणि पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा : मविआच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात:रमेश चेन्नीथला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी