30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeएज्युकेशनNashik News : उद्या आरोग्य विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा पार पडणार, 26 विद्यार्थ्यांना...

Nashik News : उद्या आरोग्य विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा पार पडणार, 26 विद्यार्थ्यांना प्रदान केली जाणार पीएच.डी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 23 व्या दीक्षांत समारंभामध्ये 26 विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवीने गौरविण्यात येणार आहे, त्याचबरोबर विविध विद्याशाखेतील 111 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. या समारंभास अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, बेळगांवचे के.एल.ई. अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्चचे कुलगुरु डॉ. नितीन गंगने हे उपस्थित राहणार आहेत.  दीक्षांत समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 12,486 स्नतकांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत.

विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदवीका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या आणि आंतरवासियता पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात  येणार आहे. याचबरोबर कुलपती तथा राज्यपाल यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचे ’ई-प्रबोधिनी’ आणि बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी पुस्तिकेची ब्ल्यु प्रिंट यांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

 ’सेंटर ऑफ एक्सलन्स’चे होणार उद्घाटन

आरोग्य क्षेत्रात मोठया प्रमाणात संशोधन, जागतिक दर्जाचे आरोग्य शिक्षण व आरोग्य सेवांमध्ये सकारात्मक बदल होण्यासाठी विद्यापीठाकडून ’सेंटर ऑफ एक्सलन्स’ ची स्थापना करण्यात आली आहे. याचे उद्घाटन शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते विद्यापीठात करण्यात येणार आहे.  विद्यापीठाच्या ’सेंटर ऑफ एक्सलन्स’ उद्घाटन कार्यक्रमास केंद्र सरकारचे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल व बोस्टन कन्सल्टींग ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक  अभिषेक गोपालका ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. दिनेश वाघमारे, कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत सकाळी 09:45 वाजता विद्यापीठातील सुश्रुत सभागृहात करण्यात येणार आहे.

आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. ख्रिस्टोफर डिसूजा यांना डी.लिट् ही विद्यापीठाची विशेष समान्य पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी विद्यापीठातर्फे सन 2007 मध्ये पद्मभुषण डॉ. एल. एच. हिरानंदानी, सन 2008 मध्ये डॉ. अनिल कोहली व सन 2015 मध्ये  डॉ. सायरस पुनावाला यांना, सन 2016 मध्ये डॉ. प्रकाश आमटे व सन 2019 मध्ये डॉ. अभय बंग  व डॉ. राणी बंग यांना डि.लिट या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. दीक्षात समारंभाचे आयोजन विद्यापीठ आवारातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत धन्वंतरी सभागृहात सकाळी 11.00 वाजता करण्यात आले आहे.

हेही वाचा : मोदीजी, तुम्ही लोकशाहीची हत्या केली आहे! राहुल गांधींचा घणाघात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी