31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
HomeराजकीयRaj Thackeray : राज ठाकरेंच्या विनंतीचा मान राखत भाजपने उमेदवार मागे घेतला;...

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या विनंतीचा मान राखत भाजपने उमेदवार मागे घेतला; ठाकरेंनी पुन्हा पत्र लिहीत मानले फडणवीसांचे आभार

भाजपने उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी आणखी एक पत्र लिहित फडणवीस आणि भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व मतदार संघातील जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार होती. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर दुसरीकडे भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी दिल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, रविवारी (16 ऑक्टोबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी भाजपने उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती केली होती. राज ठाकरे यांच्या विनंतीचा मान राखत भाजपने उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी आणखी एक पत्र लिहित फडणवीस आणि भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

रविवारी राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचा राजकिय प्रवास रेखाटला होता. शिवाय एक सर्वसामान्य शिवसैनिक ते आमदार अशा अलौकिक प्रवास करणाऱ्या रमेश लटके यांचा मान राखण्यासाठी त्यांची पत्नी ऋतुजा लटके यांनी आमदार व्हावे त्यासाठी भाजपने आपला उमेदवार मागे घ्यावा आणि ही लढत बिनविरोध व्हावी अशी विनंती केली होती. त्यानंतर फडणवीसांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून आपला उमेदवार मागे घेतला. यावर आता राज ठाकरे यांनी फडणवीस आणि इतर भाजप पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

हे सुद्धा वाचा

T20 WC : मोहम्मद शमीने एकाच ओव्हरमध्ये लुटली मैफील; भारताने उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा!

Pune News : पुणे शहरात ‘सेक्स्टॉर्शन’ वाढले! पोलिस आयुक्तांचे नागरिकांना खास आवाहन

Manava Naik : मराठमोळी अभिनेत्री मनवा नाईकसोबत गैरव्यवहार करणारा कॅब ड्राईव्हर गजाआड

दरम्यान, ही लढत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांसांठीही अस्तित्वाची लढाई असल्याचे मानले जात होते. अशा परिस्थितीत ज्या पक्षाचा उमेदवार विजयी झाला असता त्या पक्षाला आपले समाजातील आणि कार्यकर्त्यांमधील स्थान बळकट करण्यासाठी मदत मिळाली असती. मात्र, आता ही लढत बिनविरोध होणार असल्याने दोन्ही गटांना थेट मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत एकमेकांचा सामना करावा लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे या गोष्टीचा उद्धव ठआकरे गटाला जितका फायदा झाला तितकाच तोटा झाला असल्याचे राजकिय विश्लेशकांकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या मताचा आदर राखत फडणवीसांनी उमेदवार मागे घेतल्याने देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांचीही राजकारणातील प्रतिमा आणखी सकारात्म झाली असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे भाजपची विधानसभेतील निवडूण येऊ शकणारी एक जागा कमी झाली असली तरी या गोष्टीचा फायदा मुंबई महापालिका निवडणूकीत मोट्या प्रमाणात होईल असेही मतं विश्लेषकांकडून मांडले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी