26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमुंबई‘करोना’च्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्र्यांची उद्योजकांसोबत बैठक सुरू, महत्वाचे निर्णय घेणार

‘करोना’च्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्र्यांची उद्योजकांसोबत बैठक सुरू, महत्वाचे निर्णय घेणार

टीम लय भारी

मुंबई : ‘करोना’चा ( Coronavirus ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य खात्याने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर खासगी कंपन्यांचेही सहकार्य घेण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला 18 खासगी कंपन्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले आहे.

सह्याद्री अतिथी गृहावर 10.30 वाजता या बैठकीला सुरूवात झाली आहे. टाटा, रिलायन्स, सिपला, बिर्ला इत्यादी विविध कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहिले आहेत. कामावर येणाऱ्या नोकरदारांमुळे रेल्वे व बसमध्ये गर्दी वाढत आहे. त्यामुळे लोकांना घरूनच काम करण्याची मूभा देण्यात यावी, असे आवाहन या बैठकीत केले जाणार आहे. ‘करोना’चा मुकाबला करण्यासाठी काही खासगी कंपन्यांनी मदत देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यावरही चर्चा होईल. साधारण 15 मुद्द्यांबाबत कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला जाणार आहे. या प्रतिनिधींच्याही सूचना यावेळी ऐकून घेतल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

खासदार सुप्रिया सुळेंची राजेश टोपेंना शाबासकी; म्हणाल्या ‘सुपरमॅन’

Breaking : राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद, दहावी – बारावी वगळून सर्व परीक्षा रद्द

शाळांतील शिक्षकांनाही सुटी, अतिनिकडीचे काम असेल तरच शाळेत यावे लागणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी