30 C
Mumbai
Saturday, June 29, 2024
Homeराजकीयशरद पवार पंतप्रधान होणार का?; चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नावर राऊतांचे उत्तर

शरद पवार पंतप्रधान होणार का?; चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नावर राऊतांचे उत्तर

 टीम लय भारी

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार पंतप्रधान कधी होणार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडणार असा खोचक सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.( Raut’s answer to Chandrakant Patil)

पाटील यांच्यासरख्या टेकाड्यांना हिमालय आणि सह्याद्रीच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही असा खोचक निशाणा राऊतांनी साधला आहे. तसेच योग्य वेळी त्यांना उत्तर देऊ असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तम काम करत असून तेसुद्धा योग्य वेळी बाहेर पडतील तसेच पंतप्रधानांसोबत होणाऱ्या बैठकीला उपस्थिती लावतील असे संजय राऊत म्हणाले आहेत.

‘देवेंद्र फडणवीस गोव्यात गेले, अन् भाजप फुटला’

‘ते फक्त त्यांचे मत, तुमचे नशीब नाही,’ संजय राऊतांचा निशाणा नेमका कोणावर?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला की, मुख्यमंत्री कधी बाहेर पडणार आणि शरद पवार पंतप्रधान कधी होणार हे संजय राऊतांनी सांगावे असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यावर राऊत म्हणाले, त्यांना योग्य वेळी त्यासंदर्भात माहिती देऊ, मुख्यमंत्र्यांचे काम उत्तम प्रकारे सुरु आहे.

पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत ते सामील होतील हे आपण स्वतः पाहाल, शरद पवार यांच्या इतकी राजकारणाची, समाजकारणाची आणि व्यक्तिमत्वाची आधी उंची गाठा, तुमच्या सारख्या टेकाड्यांना हिमालय किंवा सह्याद्रीच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही. पंतप्रधान पदावर जर एखादा माणूस बसला म्हणून तो मोठा होत नाही. पंडित नेहरु, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांची उंची मोठी होती. परंतु अनेकदा अनेक व्यक्ती त्या पदावर पोहचू शकल्या नाही परंतु त्यांची उंची कमी होत नाही असे संजय राऊत म्हणाले आहेत.

८० विरुद्ध २० च्या विधानावरून मुख्यमंत्री योगींवर नवाब मलिकांची टीका, म्हणाले…

TMC’s presence in Goa will benefit BJP in polls, says Sanjay Raut

फडणवीस गोव्यात गेले अन पक्ष फुटला

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून गोव्यात गेले आहेत. देवेंद्र फडणवीस गेल्यानंतर भाजप फुटला आहे. काल एक मंत्री मायकल लोबो यांनी पक्षाचा त्याग केला आहे. तेव्हा फडणवीसांनी आपल्या पक्षांतर्गत जे काही युद्ध सुरु आहे. ती लढाई करावी. प्रश्न नोटांचा म्हणत आहेत. ते त्यांनी बरोबर म्हटलं आहे. आमची लढाई खर तर नोटांशीच आहे.

भाजपचे लोकं ज्या प्रकारे निवडणुकीत नोटांचा पाऊस पाडत आहेत. महाराष्ट्रातून ज्या काही नोटांच्या बॅगा चालल्या आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष गोव्यात त्या नोटांशी नक्की लढेल आणि गोव्यातील जनतेला सांगणार आहे की, नोटांच्या दबावात येऊ नका.

शिवसेना हा सामन्यांचा बहुजनांचा पक्ष आहे. हिंदुत्ववादी पक्ष आहे. हा या नोटांना पुरुन उरेल हे नक्कीच आहे. देवेंद्र फडणवीसांना माझा शब्द आहे कितीही नोटा टाका आम्ही नोटांशी लढू असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी