35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्ररवींद्र धंगेकरांनी घेतली शरद पवारांची भेट; नेमकी काय झाली चर्चा?

रवींद्र धंगेकरांनी घेतली शरद पवारांची भेट; नेमकी काय झाली चर्चा?

लोकसभेची उमेदवारी (Lok Sabha Election  जाहीर झाल्यानंतर रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची आज भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळं पुणे लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडी मध्ये पुणे लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस पक्षाने रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी मनसे मधून बाहेर पडलेले आणि पुण्यासाठी इच्छूक वसंत मोरे यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळ पुण्यातील राजकारणाला नवं वळण लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. (Ravindra Dhangekar Meet Sharad Pawar pune lok sabha)

महाविकास आघाडीत काही जागांचा तिढा अद्याप सुटू शकलेला नसल्याने सार्‍या उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकलेली नाही. कॉंग्रेस त्यांची यादी स्वतंत्र जाहीर करत आहे. राज्यभर सभांदरम्यान उद्धव ठाकरे उमेदवार जाहीर करत आहे. शरद पवारांकडून आतापर्यंत केवळ सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, धंगेकर यांनी शरद पवारांची भेट घेत त्यांचा आशीर्वाद घेतला.

घड्याळ चिन्ह वापरण्याची आम्हाला परवानगी, अजित पवारांच्या NCPचे पहिले निवेदन प्रसिद्ध

दोघांत नेमकी चर्चा काय झाली ?

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. देशाच्या उभारणीमध्ये शरद पवार यांचे मोठ योगदान असून त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले आहे. तर आता लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून, मला पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; कोल्हापुरात शाहू महाराजांना ‘वंचित’चा पाठिंबा

त्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडून आगामी काळात निवडणुकीकरीता मार्गदर्शन घेतले. त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली असून त्यांच्या मार्गदर्शनाचा निवडणुकीत नक्किच फायदा होईल. तसेच पुणे लोकसभेत येणार्‍या काळात सहा विधानसभा मतदारसंघांत होणार्‍या सभांमध्ये शरद पवार हे उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शनदेखील करणार आहेत. अशी माहितीदेखील धंगेकर यांनी यावेळी दिली.

पक्षांतर्गत मतभेदावरही त्यांनी यावेळी भाष्य केलं. आमच्या पक्षात जे काही आहे, ते दूर होईल. पण इतर पक्षातही बरेच मुद्दे आहेत. आमचे दिसत आहेत, त्यांचे नाही. जे काही दिसत आहे. त्यावर काम केले जाऊ शकते. जे पाहिले जाऊ शकत नाही, त्यावर काम केले जाऊ शकत नाही. असं खोचक विधान करत विरोधकांनी धंगेकर यांनी टोमणा हाणला.

भाजपाने पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी घोषित करण्यात आली. तर मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांच्या पदरी निराशा पडली असली तर ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. वसंत मोरे अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी