32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
HomeराजकीयPM मोदींना धक्का; केंद्रीय मंत्रिमंडळातून बड्या नेत्याचा राजीनामा

PM मोदींना धक्का; केंद्रीय मंत्रिमंडळातून बड्या नेत्याचा राजीनामा

मोदी सरकारने २ टर्म पूर्ण केल्यानंतर आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok sabha election) भाजपने (BJP) कंबर कसली आहे. अशातच, एनडीए (NDA) मध्ये जागा वाटपावर नाराज असलेले पशुपती पारस(Pashupati Kumar ) यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. पशुपती पारस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. मी प्रामाणिकपणे, निष्ठेने एनडीएची सेवा केली. माझ्या पक्षासोबत अन्याय झाल्याने मी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा देतोय असं पशुपती पारस यांनी म्हटलं आहे.(RLJP President Pashupati Kumar Paras resigns as Union Minister.)

मोदी सरकारने २ टर्म पूर्ण केल्यानंतर आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok sabha election) भाजपने (BJP) कंबर कसली आहे. अशातच, एनडीए (NDA) मध्ये जागा वाटपावर नाराज असलेले पशुपती पारस(Pashupati Kumar ) यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. पशुपती पारस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. मी प्रामाणिकपणे, निष्ठेने एनडीएची सेवा केली. माझ्या पक्षासोबत अन्याय झाल्याने मी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा देतोय असं पशुपती पारस यांनी म्हटलं आहे.(RLJP President Pashupati Kumar Paras resigns as Union Minister)

पशुपती यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर ते इंडिया आघाडीच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

राज ठाकरे दिल्लीत जाताच शरद पवारांच्या गटात खळबळ; रोहित पवारांनी दिली ऑफर

पारस यांचे मोदींना पत्र?

“सर, मी तुम्हाला कळवू इच्छितो की काही अपरिहार्य कारणांमुळे मी मंत्रिपरिषदेचा तात्काळ राजीनामा देत आहे. यावेळी, मंत्रिपरिषदेचा सदस्य म्हणून माझ्यावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद.असे लिहिले आहे.

एनडीएने काल बिहारमध्ये जागावाटपाची घोषणा केली होती. यामध्ये पारस यांचा पुतण्या चिराग पासवान याला प्राधान्य देण्यात आले. लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास) पाच जागा देण्याची घोषणा करण्यात आली.लोक जनशक्ती पक्षाचे (लोजप) संस्थापक रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पक्षात फूट पडली होती.

एलजेपीच्या सहापैकी पाच खासदार पारस गटात सामील झाले. एवढेच नाही तर पशुपती पारस यांना मोदी मंत्रिमंडळात मंत्री करण्यात आले.त्यानंतरही चिराग पासवान सक्रिय राहिले आणि आता एनडीएमध्ये समीकरणे बदलली आहेत. यामुळे संतापलेल्या पारस यांनी राजीनामा दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी