29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्र#VidhanSabha2019 : राम शिंदे यांना धक्का, महत्वाचे पदाधिकारी रोहित पवारांच्या गटात

#VidhanSabha2019 : राम शिंदे यांना धक्का, महत्वाचे पदाधिकारी रोहित पवारांच्या गटात

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याचे पणन व वस्त्रोद्योगमंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी रिंगणात उतरण्याची जोरदार तयारी करत राम शिंदेंसमोर कडवे अव्हान उभे केले आहे. यामुळे राज्यातील सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ म्हणून कर्जत – जामखेडच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

पवार व शिंदे गटाकडून मतदारसंघात जोरदार वातावरण निर्मिती केली जात आहे. त्याबरोबर फोडाफोडीच्या राजकारणालाही वेग आला आहे. कर्जत तालुक्यातील मिरजगाव जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य तथा युवा नेते परमवीर पांडूळे यांनी राम शिंदेंची साथ सोडत राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांना जामखेड तालुक्यातील झिक्री गावात पत्रकार परिषद घेऊन जाहिर पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

माझ्या सोबत भाजपमधून आलेले सगळे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, सदस्य व कार्यकर्ते यांच्यासह मी रोहितदादा पवार यांना पाठींबा द्यायचा निर्णय घेतला आहे. 

-परमवीर पांडूळे

निवडणुका जिंकण्यासाठी निवडणुकांमध्ये ऐकेक मतदान महत्वाचे असते. मतदारांना प्रभावित करणारा प्रत्येक कार्यकर्ता व नेता महत्वाचा असतो. अशा या परिस्थितीत पणन मंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाच्या कर्जत तालुक्यातील प्रभावशाली युवा नेत्याने आपल्या समर्थकांसह रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राम शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे.

भारतीय जनता पक्षाचे मिरजगाव जिल्हा परिषद गटातील माजी सदस्य परमवीर पांडूळे यांनी रोहित पवार यांना पाठींबा द्यायचा निर्णय घेतला आहे. रोहित पवार यांच्या उपस्थितीत पांडूळे व त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. पांडूळे यांच्या प्रवेशामुळे रोहित पवार यांची मतदारसंघात ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत मागील आठवड्यात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे तसेच जामखेड पंचायत समितीच्या उपसभापती राजश्री मोरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडूळे यांनी राष्ट्रवादीशी घरोबा केल्याने भाजपाच्या गोटात मोठा गदारोळ उडाला आहे. रोहित पवारांच्या सर्जिकल स्ट्राईकवर मंत्री राम शिंदे कोणता मास्टर स्ट्रोक खेळणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी