25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeराजकीयरोहित पवारांकडून निर्मला सीतारामण यांना वाढदिवसाच्या खोचक शुभेच्छा !

रोहित पवारांकडून निर्मला सीतारामण यांना वाढदिवसाच्या खोचक शुभेच्छा !

टीम लय भारी

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जसे पेट्रोल-डिझेलच्या दराने शकत पार केले आहे, तसेच तुम्ही आयुष्याचे शतक पार करावे. त्यासाठी आपणास उत्तम आरोग्य लाभावे हीच प्रार्थना, अशा खोचक शब्दांत रोहित पवार यांनी निर्मला सीतारामण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत (Rohit Pawar wish Happy Birthday to Nirmala Sitharaman).

रोहित पवार यांनी निर्मला सीतारामण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत टोमणा मारला आहे. सध्या देशाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दराने शकत पार केले. जसे पेट्रोल-डिझेलच्या दराने शकत पार केले आहे, तसेच तुम्ही आयुष्याचे शतक पार करावे. त्यासाठी आपणास उत्तम आरोग्य लाभावे हीच प्रार्थना. तसेच देशाची तिजोरी सक्षमपणे सांभाळणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, अशा शब्दांत रोहित पवार यांनी ट्विट करत निर्मला सीतारामण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रवादीने हाती घेतले ‘भगवे’ राजकारण, आमदार रोहित पवारांचा पुढाकार

रोहित पवारांच्या एका फोनवर महिलेचा प्रश्न सुटला

पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी देशात सध्या ऐतिहासिक उंची गाठली आहे. देशात पेट्रोलच्या दरांत चार मे नंतर 41 वेळा वाढ झाली. तर डिझेलच्या दरांमध्ये 37 वेळा वाढ झाली. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. देशातील प्रत्येक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या दर हे वेगवेगळे आहेत.

Rohit Pawar wish Happy Birthday to Nirmala Sitharaman
पेट्रोल-डिझेलचे दर हे शकत पार झाले आहेत, तसेच तुम्ही आयुष्याची शतकी पार करावी

सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर डागली तोफ

FM Nirmala Sitharaman’s birthday today: Here’s looking at 5 major decisions taken under her Ministership

शहरे              पेट्रोल       डिझेलचे
दिल्ली            101.84       89.87
मुंबई             108.83       97.45
चेन्नई             102.49       94.39
कोलकाता      102.08       93.02
बंगळुरु          105.25       95.26
भोपाळ          110.20        98.67
चंदीगड          97.93         89.50
रांची              96.68         94.84
लखनऊ        104.25        95.57

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी