31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयसदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर डागली तोफ

सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर डागली तोफ

टीम लय भारी

मुंबई :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नियुक्ती भरत्या अजूनही रखडलेल्या आहेत. उमेदवारी भरतीवर आमदार रोहित पवार हे आपल्या पवार घराण्याने दिलेले शब्द खरंच पाळतात का? असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे (Sadabhau Khot fired a cannon at Rohit Pawar).

एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्ती मिळाली नाही. म्हणून पुण्यातील स्वप्नील लोणकर याने निराश होऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 31 जुलै पर्यंत नियुक्ती करू, अशी घोषणा केली होती. परंतु अद्यापही नियुक्त्या झाल्या नाहीत. अजित पवार हे शब्द पाळणारे नेते आहेत. परंतु यावर अजून काही तोडगा निघाला नाहिये. रोहित पवार आणि राज्यपाल यांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या ट्विट वरून, रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी संताप व्यक्त केला आहे. “तुमच्या चुकांमुळे लोक मेले, परंतु अजूनही तुमचं राजकारण काही संपेना” असे विधान त्यांनी पवारांवर केले आहे. एमपीएससी सदस्यांच्या संदर्भातील वकीलपत्र तुम्ही जरूर घ्या पण, खोटे युक्तिवाद करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नका. अशा कडक शब्दांची रोहित पवारांवर तोफ डागली आहे (Strict words have been fired at Rohit Pawar).

नक्की काय घडले?

अद्याप नियुक्ती न झाल्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यावर, “उपमुख्यमंत्री अजित पवार हे शब्द पाळणारे नेते आहेत. एमपीएससीच्या रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी सरकारने 31 जुलै पूर्वीच राज्यपाल महोदय यांच्याकडे सदस्यांची यादी पाठवली आहे. ती विधान परिषदेच्या आमदारांची यादी नसल्याने, महामहीम राज्यपाल महोदय तातडीने मंजूर करतील असा विश्वास आहे.” असे रोहित पवारांनी ट्विटरवर म्हटले होते.

Sadabhau Khot fired a cannon at Rohit Pawar
रोहित पवार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

तसेच, त्यावर राज्यपालांनी प्रत्युत्तर असे दिले आहे की एमपीएससी सदस्य निवडणुकीची फाईल अगोदरच राजभवन येथे पाठवली आहे. अश्या आशयाच्या बातम्या काही वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द झाल्या आहेत. त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची शिफारस असलेले पत्र  (ता. 2) ऑगस्ट रोजी दुपारनंतर राजभवन येथे प्राप्त झालेली असून, ती राज्यपालांच्या विचाराधीन आहे.

परंतु, आता ह्या सरकारी खोट्या खेळामुळे आणखी कोणाचे जीव जाऊ नये. विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नये. असे मत रयत क्रांतिकारी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी