28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयराम शिंदेंनी रोहित पवारांची उडविली खिल्ली

राम शिंदेंनी रोहित पवारांची उडविली खिल्ली

टीम लय भारी

मुंबई :-  राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये टीकास्त्र सुरू आहे. आमदार रोहित पवार रोज आपल्या मतदारसंघात नवनवीन कार्यक्रम घेत असल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकत असतात. यावरून आमदार रोहित पवारांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी सणसणीत टोला लगावला आहे (Rohit Pawar has been slammed by Ram Shinde).

कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सुनीता खेडकर यांच्या पुढाकारातून झालेल्या विविध कामांचे उद्घाटन राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राम शिंदे यांनी सुनीता खेडकर यांच्या कामाचे कौतूक केले. यानंतर राम शिंदे म्हणाले, रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात आणि 10-15 फोटो काढून जातात. नंतर सोशल मीडियावर पोस्ट करुन रोज कार्यक्रम घेत असल्याचे दाखवतात असा सणसणीत टोला राम शिंदे यांनी रोहित पवारांना लगावला आहे.

जिनके हाथ खून से रंगे हो, वो… चाकणकरांची केंद्रीय मंत्रिमंडळावर बोचरी टीका…

मंत्र्यांची संख्या वाढली; पण कोरोना लसीची नाही, राहुल गांधीचा मोदींना टोला

यानंतर राम शिंदे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना मी मतदारसंघातील कामांबद्दल अनेक प्रश्न विचारले. परंतु, आमदार रोहित पवार यांच्याकडून त्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. माझ्या प्रश्नांना उत्तरे द्यायला ते घाबरतात काय? आमदार रोहित पवार एक दिवस येतात, दहा-पंधरा फोटो काढून जातात. नंतर सोशल मीडियात पोस्ट करून रोज कार्यक्रम घेत असल्याचे दाखवितात. जलयुक्त शिवार कामाची चौकशी कर्जत तालुक्यातच जास्त सुरू आहे. पण कितीही चौकशी करा, यातून काहीच निष्पन्न होणार नाही असेही राम शिंदे म्हणाले आहेत (Ram Shinde has also said that nothing will happen).

Rohit Pawar has been slammed by Ram Shinde
रोहित पवार आणि राम शिंदे

येत्या वर्षात महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुयारी मार्ग तयार होणार

BJP leader Gopichand Padalkar gets booked for ‘Overcrowding’; Rohit Pawar justifies his attack

मागील सरकारच्या काळात झालेल्या जलसंधारणाच्या कामांची चौकशी सुरू आहे. मात्र, ही चौकशी जास्त प्रमाणात आपल्या कर्जत तालुक्यातच करण्यात येत आहे. ती कोणामुळे आणि कशासाठी केली जात आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, यामध्ये काहीही आढळून येणार नाही. त्यावेळी जलसंधारणाची सर्व कामे जनतेच्या हितासाठीच झाली होती. गावात सुरू असलेले पाण्याचे टँकर बंद झाले, पाणी उपलब्ध झाल्याने पिके चांगली आली. हाच ही कामे योग्य पद्धतीने झाल्याचा पुरावा आहे. त्यामुळे माझे आव्हान आहे की चौकशी कराच असे राम शिंदे यांनी आव्हान दिले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी