28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeराजकीयमुंबई पोलिसांनी घेतली सचिन वाझेची कस्टडी

मुंबई पोलिसांनी घेतली सचिन वाझेची कस्टडी

टीम लय भारी

मुंबई: मुंबई पोलीस गुन्हे शाखेने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची कस्टडी घेतली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्ह्यात सोमवारी सचिन वाझेला तळोजा तुरुंगातून ताब्यात घेतले असून पोलीस सचिन वाझेला घेऊन तळोजावरुन निघाले आहेत. सचिन वाझे याला मुंबई पोलिसांच्या मुख्यालयातील गुन्हे शाखेच्या कार्यलयात  अटकेची प्रक्रिया पूर्ण करुन  किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे(Sachin Waze is in the custody of Mumbai Police)

न्यायालयाकडून सचिन वाझेची पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. गुन्हे शाखा कक्ष ११ कडे गोरेगाव येथील हॉटेल व्यवसायिकाकडे खंडणीचा तपास देण्यात आला आहे. या गुन्हयात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग,सचिन वाजेसह काही अधिकारी आणि खाजगी व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर शोएब अख्तरची प्रतिक्रिया

दिवाळीनंतरच्या धमाक्यासाठी “है तैयार हम”, फडणवीसांच्या इशाऱ्यावर नवाब मलिकांचे प्रत्युत्तर

मुंबई गुन्हे शाखेने सचिन वाझेचा ताबा मिळावा यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर न्यायालयाने हा अर्ज मान्य करुन कारागृहाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सचिन वाझेंच्या प्रकृतीबाबतची माहिती मागवली होती. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेला अटक केल्यानंतर त्याला तळोजा कारागृहातील वैद्यकीय वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच्यावर ह्रदयाची शस्रक्रिया देखील करण्यात आली.

कारागृहाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सचिन वाझे प्रवास करू शकतो अशी माहिती दिल्यानंतर १ नोव्हेंबर रोजी सचिन वाझेची कस्टडी गुन्हे शाखेकडे देण्यास समंती दिली. त्यानुसार आज १ नोव्हेंबर रोजी मुंबई गुन्हे शाखेने सचिन वाझेची कस्टडी घेतली आहे.

नवाब मलिकांना मानसोपचार तज्ज्ञांकडे तपासणीची आवश्यकता : प्रवीण दरेकर

Republic Confronts Sachin Vaze As Mumbai Police Takes His Custody In Extortion Case

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी