31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयशरद पवार यांना आमदार सदाभाऊ खोत यांचे पत्र, हर्बल तंबाखूची लागवडीसाठी मागितली...

शरद पवार यांना आमदार सदाभाऊ खोत यांचे पत्र, हर्बल तंबाखूची लागवडीसाठी मागितली परवानगी

टीम लय भारी

मुंबई : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. हर्बल तंबाखूच्या लागवडीसाठी सरकारने परवानगी द्यावी. यासाठी खोत यांनी हे पत्र शरद पवार यांना लिहिले आहे (Sadabhau Khot wrote letter to Sharad Pawar).

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार काम करीत आहे. तसेच कोरोना महामारी, अतिवृष्टी, चक्रीवादळ आणि महापूर अशा संकटात शेतकरी सापडला आहे. त्यात माविआ सरकारने शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केल्यामुळे शेतकरी गळफास लावून आत्महत्या करत आहेत. त्यामुळे शेती करणे त्यांना अक्षरशः परवडेनाशी झाली आहे. असे खोत यांनी पत्रात लिहिले आहे.

अडचणीत वाढ, शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीने बजावले समन्स

पंखात बळ भरणारे ‘ऑल इज वेल’ पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला

सरकार पुरेशी मदत करत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना गांजा सारखे पीक घ्यावे असे वाटत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावातील अनिल बाबाजी पाटील या शेतकऱ्याने आपल्या क्षेतात हर्बल वनस्पतीची लागण करण्याची मागणी केली आहे.

राज्यातील वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांना हर्बलची शेती करायची आहे. परंतु राज्यात त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. पण अलिकडे आपल्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील एक वरीष्ठ मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाकडे मौल्यवान हर्बल तंबाखू सापडल्याचे आपण सांगितले आहे.नवाब मलिक यांचे जावई या मौल्यवान हर्बल तंबाखू तून श्रीमंत झाल्याचे पाहून महाराष्ट्रातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत.

Narendra Singh Tomar : तोडगा निघणार? सरकार शेतक-यांची आज चर्चा सरकारवर दबावतंत्राचा वापर नको

I forced Udhhav to become CM of Maharashtra, says NCP’s Sharad Pawar after Fadnavis’ jibe

त्यामुळे शरद पवार यांनी हर्बल तंबाखूच्या लागवडीसाठी तात्काळ परवानगी द्यावी. जेणेकरुन महाराष्ट्रातील गरीब शेतकरी व कष्टकरी शेतमजूर नवाब मलिक यांच्या जावयासारखा श्रीमंत होईल. असे खोत यांनी पत्रात म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी