33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयराज्यातील कोविड नियमांमध्ये शिथिलता, उपाहारगृहे आणि दुकाने यांच्या वेळा वाढविणार

राज्यातील कोविड नियमांमध्ये शिथिलता, उपाहारगृहे आणि दुकाने यांच्या वेळा वाढविणार

टीम लय भारी

मुंबई : कोरोना रुग्ण संख्येत घट होत असल्यामुळे राज्यातील उपहारगृहे आणि दुकाने यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युजमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईडसाठी परवानगी देण्याचे ठरले आहे. वर्षा येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतले (Uddhav Thackeray held a meeting to relax the Kovid rules in the state).

अम्युजमेंट पार्क देखील २२ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. तसेच डेंगू आणि चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे या आजारांच्या उपचारासाठी पुरेसे लक्ष द्यावी अशा सूचना मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत.

…तेव्हा या कांचनगिरी होत्या कुठे?”; मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर महापौर किशोरी पेडणेकरांचा सवाल

राज्यातील वाहतूकदारांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्ण संख्या कमी होतांना दिसत आहे. 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांची देखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

…तेव्हा भाजपाने हे आव्हान स्वीकारण्याची मर्दानगी दाखवायला हवी; शिवसेनेचा हल्लाबोल

I Insisted Uddhav Thackeray To Become Maharashtra Chief Minister: Sharad Pawar

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वछ धूत राहणे खूप आवश्यक आहे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बिआठकीत म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी