30 C
Mumbai
Saturday, February 24, 2024
Homeराजकीयउद्धव आणि राज एकत्र; आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण

उद्धव आणि राज एकत्र; आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण

आगामी निवडणुका आता येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही शिवसेना ठाकरे गट राज्यात २३ जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आहे. अशातच काही दिवसांआधी दिशा सालियानप्रकरणी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना माध्यमांनी आदित्य ठाकरेंवर एसआयटी (SIT) चौकशी करण्यात येणार असल्याचं विचारण्यात आलं, यावर शर्मिला ठाकरे यांनी आदित्यने असं काही केलं असेल मला नाही वाटत असं वक्तव्य केलं. आपल्या काकीने पुतण्याची बाजू घेतली आहे अशातच आता आज राज ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचं खरं कारण आता आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

एका घरगुती कुटुंबाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे गेले होते. यावेळी राज ठाकरेंच्या भाच्याचा साखरपुडा होता. यावेळी दोघेही सोबत दिसले आहेत. यावर आता आदित्य ठाकरे यांना माध्यमांनी विचारले असता, ते म्हणाले की, ते लग्नामध्ये शुभेच्छा देण्यासाठी आले होते. दादर येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी ठाकरे कुटुंब एकत्र आले होते. यावेळी राज आणि उद्धव हे एकाच फ्रेममध्ये दिसले आहेत.

हे ही वाचा

अर्जुन पुरस्काराचा मानकरी मोहम्मद शमी

शिवसेना ठाकरे गट लढवणार एवढ्या जागा; संजय राऊत यांची स्पष्टोक्ती

थर्टी फर्स्ट आणि नाताळ होणार दणक्यात साजरा; पहाटे पाच वाजेपर्यंत बार असणार सुरु

काय म्हणाल्या होत्या शर्मिला ठाकरे?

आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियान प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याबाबत विचारले असता, शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, मला नाही वाटत आदित्य असं करेल. आम्हीही याच्यातून गेलो आहे. आरोप करायला कोणीही करतं असं म्हणत शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंची बाजू घेतल्याचं दिसत आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनी राम मंंदिराबाबत माध्यमांशी बोलताना राम मंदिच्या प्रणप्रतिष्ठेसाठी आम्हाला आयोध्येला जाण्यासाठी कोणाच्या निमंत्रणाची गरज नसल्याचं सांगितलं.

आयोध्येला येण्यासाठी कोणाच्या निमंत्रणाची गरज नाही – आदित्य ठाकरे

माध्यमांशी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी कोणाचं नाव न घेता मोदी सरकारवर टीका केली आहे. मंदिर निर्माणाशी कोणाचाही संबंध नाही. ते फक्त आता आयोध्येला उद्घाटनासाठी चालले आहेत. हा विषय आम्ही घेतला होता. माझ्या आजोबांनी मंदिर निर्माणाच्यावेळी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. आम्ही आयोध्येला जाऊ मात्र कोणाच्या निमंत्रणाची गरज नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी