30.4 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरराजकीयगुजरात जिंकण्यासाठी मोदींना मेहनत घ्यावी लागतेय, संजय राऊतांचा हल्लाबोल

गुजरात जिंकण्यासाठी मोदींना मेहनत घ्यावी लागतेय, संजय राऊतांचा हल्लाबोल

संजय राऊत यांनी आता पुन्हा एकदा नवा मुद्दा उपस्थित करत भारतीय जनता पक्षावर हल्ला करायला सुरुवात केली आहे. यावेळी संजय राऊत यांच्या हल्ल्याचा विषय ठरत आहे गुजरात विधानसभा निवडणूक.

संजय राऊत यांनी आता पुन्हा एकदा नवा मुद्दा उपस्थित करत भारतीय जनता पक्षावर हल्ला करायला सुरुवात केली आहे. यावेळी संजय राऊत यांच्या हल्ल्याचा विषय ठरत आहे गुजरात विधानसभा निवडणूक. गुजरातमध्ये भाजपच्या प्रचारावर बोट ठेवत संजय राऊतांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि केंद्रीय मंत्री गुजरातमध्ये ठाण मांडून बसले आहेत. मात्र निवडणुक यंत्रणेवर विश्वास नाही अशी लोकांची भावना असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपने कुठल्याही प्रचाराशिवाय गुजरात निवडणुक जिंकायला हवी असे राऊत म्हणाले.

गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधानांनी त्यांचा बराचशा वेळ गुजरातला दिला आहे, पंतप्रधान मोदी हे 3 वेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरात निवडणुक जिंकण्यासाठी मोदींना मेहनत घ्यावी लागतेय. तसेच भाजपने कुठल्याही प्रचाराशिवाय गुजरात निवडणुक जिंकायला हवी असे राऊत म्हणाले. तसेच लोकं असे म्हणतात, निवडणुक यंत्रणेवर आमचा विश्वास नाही, म्हणजेच सरकारच्या विरुद्ध लोकांची भावना असली तरी तेच जिंकतील असं होणार नाही. मशीन गडबड करून किती गडबड करणार, वेट अँड वॉचची भूमिका घेणे योग्य आहे.

हे सुद्धा वाचा

शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या रावसाहेब दानवेंच्या घरी शिवभक्त धडकणार

महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये 1 एप्रिलपासून होणार मोठे बदल !

ऑस्ट्रेलियाचा ‘लायन’ अश्विनपेक्षा भारी

आज 5 डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर हे मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात आज 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. बनासकांठा, पाटण, मेहसाणा, साबरकांठा, अरवली, गांधीनगर, अहमदाबाद, आनंद, खेडा, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा आणि छोटा उदेपूर या जिल्ह्यातील हे 93 मतदारसंघ आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेते आज मतदान करणार आहेत.

महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाईंनी किमान कर्नाटक-बेळगाव सीमारेषेला स्पर्श तरी करावा असx राऊत म्हणाले. बाकी तुम्हाला काय कबड्डी खेळायचे असेल ते इथे खेळा. पण हे लाचार लोकं आहेत, असं वक्तव्य करत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महाराज कोकणात जन्मले असं प्रसाद लाड यांनी वक्तव्य केलं होतं. यावर शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी का खेळता? संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला आहे. भाजपला शिवरायांचा इतिहास का बदलायचा आहे? असा सवाल करत राऊतांनी टीका केलीय.

राज्यपालांवर कारवाई करावीच लागणार, आशिष शेलारांनी राज्यपालांना का रे केलं. आधी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत असं वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांच्या राजभवनात घुसून त्यांचा चहा न पिता, त्यांची बिस्कीटं न खाता त्यांना विचारा की, का रे शिवरायांचा अपमान करता? का रे तुम्ही छत्रपतींची बदनामी करता? पण भाजप नेत्यांच्या मनगटात तेवढी हिंमत नाही. भाजपनं शिवनेरीवर फुली मारली आहे. असं राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!