35 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeराजकीयसंजय राऊतांचा आरोप, सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू

संजय राऊतांचा आरोप, सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू

टीम लय भारी

मुंबई:- महाराष्ट्र सरकारने गुरुवारी राज्यातील सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअरमध्ये वाइन विक्रीला परवानगी दिली. शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न देणाऱ्या फळांवर आधारित वायनरींना चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना सांगितले. (Sanjay Raut’s allegation, enemies of farmers who oppose)

100 चौरस मीटर किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळ असलेल्या आणि महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना कायद्यांतर्गत नोंदणीकृत असलेल्या सुपरमार्केट आणि वॉक-इन-स्टोअरमध्ये “शेल्फ-इन-शॉप” पद्धतीचा अवलंब केला जाईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री शिवसेनेचा म्हणून मूळव्याध सतत सतवतो आहे का? महापौरांचा भाजपला टोला

राणे कुटुंबाला आता तरी याची जाणीव होईल,शिवसेनेचा टोला

भाजपाने उगाच इतिहासाची ठेकेदारी घेऊन इथे गडबड करु नये, संजय राऊतांचा इशारा

“Will BJP Ask President To Resign For Praising Tipu Sultan?”: Sena Leader

वाईन विक्रीतून जर चांगल्या पद्धतीने विक्री वाढून निर्यात वाढली तर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. यातून शेतकऱ्यांच्या मालाला भाव चांगला मिळेल. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढेल. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित आहे. जे राजकीय पक्ष याचा विरोध करत आहेत, त्यांनी याचा विचार करावा. त्यांनी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित समजून घ्यावं, सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, असा थेट आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.,

राऊत म्हणाले की, महाराष्ट्राला एक परंपरा आहे. महाराष्ट्रानं काय बनावं यासाठी मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीचे नेते समर्थ आहेत. त्यांना सरकार चालवायचा चांगला अनुभव आहे. उगाच विरोधकांनी लेबल लावू नये,तसेच विरोधकांवर टीका करत राऊत म्हणाले की, तुम्ही अशी लेबलं लावू नका. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय धाडसाने घ्यावे लागतात. तुमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र खऱ्या अर्थाने मद्यराष्ट्र होईल असे निर्णय घेतले जाणार होते पण ते आम्ही होऊ दिलं नाही. शेतकऱ्याला चार पैसे मिळणार असतील तर केंद्रानेही असे धाडसी निर्णय घेणं गरजेचं आहे,  असं राऊत म्हणाले.

सध्या, राज्यात दारूच्या दुकानातूनच वाइन विक्रीला परवानगी आहे. अहवालानुसार, देशातील वाइन उद्योगातील ६५ टक्के युनिट्स राज्यात आहेत, त्यापैकी बहुतांश नाशिक, सांगली, पुणे, सोलापूर, बुलढाणा आणि अहमदनगरमध्ये आहेत.

परंतु प्रार्थनास्थळे किंवा शैक्षणिक संस्थांजवळ असलेल्या सुपरमार्केटमध्ये वाइन विकता येणार नाही. याशिवाय दारूबंदी लागू असलेल्या जिल्ह्यांमध्ये वाइन विक्रीला परवानगी दिली जाणार नाही. सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी 5,000 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

 

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी