28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयशिवसेनेच्या धनुष्यबाणावर तारीख पे तारीख सुरूच...

शिवसेनेच्या धनुष्यबाणावर तारीख पे तारीख सुरूच…

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Election Commission of India) आज शिवसेनेचे पक्ष चिन्ह (Shiv Sena election symbol) धनुष्यबाणावरील हक्काबाबत सुनावणी (Hearing) पार पडली. शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांचा आज सुमारे चार तास आयोगात यावर युक्तीवाद पार पडला. मात्र आजच्या सुनावणीत देखील पक्ष चिन्ह कोणाचे याचा तिढा सुटला नाही. निवडणूक आयोगाने आज दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश देत पुढच्या सुनावणीची तारीख दिली. निवडणूक चिन्हावरील पुढील सुनावणी आता ३० जानेवारी रोजी होणार आहे. (Shiv Sena election symbol Hearing now on 30th January)

निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाच्यावतिने अॅड. कपिल सिब्बल आणि आणि अॅड. देवदत्त कामत यांनी युक्तीवाद केला. तर शिंदे गटाच्या वतीने अॅड. महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद केला. यावेळी शिंदे गटाच्या वकिलांनी मांडलेल्या मुंद्यांचा त्यांनी जोरदार प्रतिवाद केला. कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या घटनेनुसार प्रतिनिधी सभा ठाकरे गटाची असल्याचे सांगत शिंदे गटाची प्रतिनिधी सभाच नसल्याचे त्यांनी निवडणूक आयोगासमोस युक्तीवाद करताना सांगितले. तसेच पक्षसोडून गेलेले लोक प्रतिनिधी सभेचा भागच असू शकत नाहीत या मुद्यावर देखील त्यांनी आपल्या युक्तीवादात भर दिला.

हे सुद्धा वाचा

भले शाब्बास, शिवसेनेचा लय भारी गेम केला तुम्ही, असे तर मोदी हे शिंदे-फडणवीसांना सांगत नसावेत ना?

‘काळा घोडा कला महोत्सवा’ला मुंबई उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील; अल्पोपहार स्टोल्सना मात्र ‘नो एन्ट्री’

राखी सावंतला पोलिसांनी अटक केली नाही कारण…

तर कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादावर प्रतिवाद करताना शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांनी पक्षाची प्रतिनिधी सभा महत्त्वाची नसून लोकप्रतिनीधींची संख्याच महत्त्वाची आहे. लोकसभा आणि विधानसभेत शिंदे गटाची संख्या जास्त आहे. त्यामुळे पक्ष चिन्हावर देखील आमचाच हक्क असल्याचे जेठमलानी म्हणाले.

आज दोन्ही गटांचे युक्तीवाद निवडणूक आयोगाने ऐकुन घेतले. तसेच सोमवारी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश देखील दिले. यावेळी निवडणूक आयोगाने ३० जानेवारी रोजीची सुनावणीची तारीख दिली असून. आता लेखी उत्तरात दोन्ही गट काय दावे करणार त्यावर देखील सुनावणीत खल होण्याची शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी