30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeफोटो गॅलरीसेंट्रल व्हिस्टा : भारताच्या नवीन संसद भवन इमारतीची एक्स्ल्युझिव्ह छायाचित्रे 

सेंट्रल व्हिस्टा : भारताच्या नवीन संसद भवन इमारतीची एक्स्ल्युझिव्ह छायाचित्रे 

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी रोजी सुरू होत आहे. त्यापूर्वी, या आठवड्यात ही नवीन संसद भवनाची सेंट्रल व्हिस्टा ही आयकॉनिक इमारत तयार होत आहे. (फोटो स्रोत: centervista.gov.in)

नवीन संसद भवन सेंट्रल व्हिस्टा
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी रोजी सुरू होत आहे. त्यापूर्वी, या आठवड्यात ही नवीन संसद भवनाची सेंट्रल व्हिस्टा ही आयकॉनिक इमारत तयार होत आहे. (फोटो स्रोत: centervista.gov.in)
नवीन संसद भवन सेंट्रल व्हिस्टा इमारत
नवीन संसदेचे बांधकाम आणि सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकासासाठी जबाबदार असलेल्या केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने आज या स्टेट ऑफ दी आर्ट त्रिकोणी-आकाराच्या संरचनेच्या आतील भागांचे फोटो प्रकाशित केले आहेत.
Central Vista Loksabha
लोकसभेतील 588 जागांची बैठक रचना मोराच्या थीमवर आधारित आहे.
राज्यसभा नवीन सेंट्रल व्हिस्टा इमारत
राज्यसभेत 384 जागा असतील आणि बैठक रचना कमळाच्या थीमवर आधारित आहे.
भदोही लाकूड कार्पेट संसद इमारत सेंट्रल व्हिस्टा
नवीन संसदेमध्ये पारंपरिक लाकडी संरचनेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. नवीन इमारतीच्या मजल्यांवर उत्तर प्रदेशातील भदोही येथील हाताने निर्मिलेले कार्पेट असतील. हे कमिटी रूम म्हणजे कार्यकारिणी समिती सदस्यांचे कक्षांचे प्रातिनिधिक मॉडेल छायाचित्र आहे.
नवीन सेंट्रल व्हिस्टा संसद इमारत तयार
नवीन सेंट्रल व्हिस्टा संसद इमारत तयार होत आली असली तरी आगामी अर्थसंकल्पीय आशीवेशन या नव्या इमारतीत सुरू होणार की अधिवेशनाचा उत्तरार्ध नव्या इमारतीत घेतला जाईल, ते अजून केंद्र सरकारने स्पष्ट केलेले नाही.
central vista
अहमदाबादस्थित वास्तुविशारद बिमल पटेल यांच्या नेतृत्वाखाली प्लॅनिंग आणि मॅनेजमेंटने डिझाइन संस्था असलेल्या एचसीपीने डिझाईन केलेली ही इमारत विद्यमान संसद भवनाला लागून बांधण्यात आली आहे. (फोटो स्रोत: centralvista.gov.in)
नवीन संसद भवन सेंट्रल व्हिस्टा इमारतीची ब्लू प्रिंट
नवीन संसद भवन सेंट्रल व्हिस्टा इमारतीची ब्लू प्रिंट
नवीन संसद भवन इमारतीतील सदस्यांसाठीची सुपीरियर लायब्ररी
नवीन संसद भवन इमारतीतील सदस्यांसाठीची सुपीरियर लायब्ररी
ऊर्जा-कार्यक्षम संसद | नवीन संसद भवन ही प्लॅटिनम-रेटेड ग्रीन बिल्डिंग असेल, जी पर्यावरणीय शाश्वततेसाठी भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक असेल.
ऊर्जा-कार्यक्षम संसद | नवीन संसद भवन ही प्लॅटिनम-रेटेड ग्रीन बिल्डिंग असेल, जी पर्यावरणीय शाश्वततेसाठी भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक असेल.
नवीन संसद भवन इमारत भारतीय कला-संस्कृती वारसाचे मूर्त स्वरूप
नवीन संसद भवन इमारत भारतीय कला-संस्कृती वारसाचे मूर्त स्वरूप असेल. या इमारतीत देशाच्या सांस्कृतिक आणि प्रादेशिक कला-हस्तकला यांचा समावेश करून आधुनिक भारताची चैतन्य आणि विविधता प्रतिबिंबित केली जाईल.
दिव्यांग स्नेही | संसदेची नवीन इमारत दिव्यांगांसाठी उपलब्ध असेल.
दिव्यांग स्नेही | संसदेची नवीन इमारत दिव्यांगांसाठी उपलब्ध असेल.
सेंट्रल व्हिस्टा सेंट्रल लाउंज
सेंट्रल व्हिस्टा सेंट्रल लाउंज | नव्या संसद इमारतीत खुल्या प्रांगणाला पूरक म्हणून मध्यवर्ती विश्रामगृह तयार केले जात आहे. सदस्यांसाठी संवाद साधण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण बनवण्यात येत आहे. इथल्या अंगणात राष्ट्रीय वृक्ष, वटवृक्ष असेल.
हे सुद्धा वाचा : 

संजय राऊतांचा मोदींना खास सल्ला, दिलं महाराष्ट्र मॉडेलचं उदाहरण…

पंतप्रधानांचं निवासस्थान, नव्या संसद भवनाचं काम पुढे ढकला, पवारांचा टोला

सध्या देशाला नव्या संसद भवनाची नाही, उपाय योजनांची गरज, अमोल कोल्हे बरसले

Central Vista, New Sansad Bhavan Building, सेंट्रल व्हिस्टा, नवीन संसद भवन इमारत, Exclusive First Look for Lay Bhari Readers

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी