28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयविरोधी पक्षातील सुधीर मूनगंटीवार करतात बाळासाहेब थोरातांच्या संयमाचे कौतुक

विरोधी पक्षातील सुधीर मूनगंटीवार करतात बाळासाहेब थोरातांच्या संयमाचे कौतुक

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रात सध्या विरोधी पक्ष आणि आघाडी सरकार यांच्यात मोठ्याप्रमाणात शाब्दिक वाद सुरु आहे. दोन्ही कडून देखील एकमेकांविरूद्ध टोल्यांचा भडीमार सुरु आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षातील सुधीर मूनगंटीवार यांनी कॉंग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संयमाचे कौतुक केले आहे (Sudhir Moongantiwar praises Balasaheb Thorant’s restraint).

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादावर त्यांना विचारले गेले असता, त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या संयमी वृत्तीचे कौतुक केले. आघाडी सरकारवर टीका करत असताना त्यांनी आघाडी सरकारमधील विशेषता शिवसेनेतले नेते कसे संयम सोडून, हवेत बाण मारत विरोधी पक्षावर टीका करतात. परंतु बाळासाहेब थोरात हे नेहमीच विचारपूर्वक आणि संयमाने बोलतात. त्यांना कधी संयमाच्या बाहेर जाताना बघितलेले नाही. असे मूनगंटीवार यांनी सांगितले.

बाळासाहेब थोरातांच्या कुटुंबियांच्या मनाचा मोठेपणा, सीमेवरील सैनिकांना पाठवल्या राख्या

रोहित पवार सरसावले विद्यार्थ्यांच्या मदतीला, बाळासाहेब थोरातांशी केली चर्चा

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे बोलताना नेहमी शब्द तोलून-मापूनच बोलतात. त्यांना कधीच संयम सोडून बोलताना कोणी पाहिलेले नाही. अत्यंत शांत व्यक्तिमत्व असलेले बाळासाहेब थोरात हे कधीही चीडचीड करत नाहीत. आपल्या कामाशी प्रामाणिक असणारे बाळासाहेब थोरात ह्यांचे नेहमी त्यांच्या स्वभावाबद्दल सगळ्यांकडून कौतुक होत असते (Balasaheb Thorat is always appreciated by everyone for his temperament).

बाळासाहेब थोरात यांच्या हातून माता भगिनींना मदतीचा हात

https://english.lokmat.com/maharashtra/balasaheb-thorat-reacts-to-narayan-ranes-arrest/

आज चक्क आघाडी सरकारविरुद्ध बोलताना मूनगंटीवार यांनी आघाडी सरकारमधल्याच महसूल मंत्र्यांच्या स्वभावाचे कौतुक केले आहे. त्यामुळे त्यांचा सारखे संयमी बोलणे आघाडी सरकारमधील इतर नेत्यांनी शिकावे असा अप्रत्यक्ष टोला विरोधी पक्षाला नावे ठेवणाऱ्या नेत्यांना आणि मंत्र्यांना मूनगंटीवारांनी मारला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी