30 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना आणखी एक दणका

पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना आणखी एक दणका

लय भारी न्यूज नेटवर्क

परळी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. टी. पी मुंडे यांनी भाजपमध्ये शनिवारी प्रवेश केला. ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीच हा प्रवेश सोहळा पार पडला. मुंडे यांच्या या प्रवेशामुळे धनंजय मुंडे यांची ताकद कमी झाली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, टी. पी. मुंडे यांच्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे, अशा शब्दांत पंकजाताईंनी मुंडे यांचे स्वागत केले.

पंकजाताईंना उज्ज्वल भवितव्य आहे. भाजपमध्ये त्यांची ताकद मोठी आहे. त्यांच्या खात्याची छाप देशातही उमटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्याशी ताईंचा चांगला स्नेह आहे. परळीची ही लेक मोठी होतेय. त्यांच्यामुळे आपल्या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. पंकजाताईंना अडविण्याचे पाप करू नका, अशा शब्दांत टी. पी. मुंडे यांनी धनंजय मुंडेचे नाव न घेता टोला लगावला.

पंकजाताई म्हणाल्या की, प्रा. टी. पी. मुंडे आमच्या विरोधात होते. गोपीनाथराव मुंडे सोडून गेल्यानंतर आमच्याएवढेच त्यांनाही दुःख झाले. पण त्यांनी आमच्यासोबत कधी गद्दारी केली नाही. माझ्या विरोधात त्यांनी निवडणूक लढविली होती, पण दुरावा कधी निर्माण होऊ दिला नाही. आमच्यापासून ते दूर गेले याचे आम्हालाही वाईट वाटले होते. पण ते आता परत आल्याचा आनंद आहे. हा मतदारसंघ मुळचा काँग्रेसचा होता. पण केवळ मला त्रास देण्यासाठी राष्ट्रवादीने हा मतदारसंघ काँग्रेसकडून हिसकावून घेतला. टी. पी. मुंडे यांचा आता भाजपमध्ये योग्य तो सन्मान केला जाईल, असे सांगायलाही पंकजाताई विसरल्या नाहीत.

शरद पवार – धनंजय मुंडेंनी काँग्रेस संपविली

काँग्रेस पक्ष संपवण्याला शरद पवार आणि धनंजय मुंडे हेच जबाबदार आहेत असा आरोप टी. पी. मुंडे यांनी केला. गोपीनाथ मुंडे यांच्याकडे जादूची कांडी होती. ही कांडी आता पंकजाताईंकडे आली आहे. त्यांच्या या प्रभावानेच आपण काँग्रेस विसर्जित करून तो भाजपमध्ये परावर्तीत केला असल्याचे मुंडे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी