27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरे, अजित पवार भेटीने राजकीय चर्चांना उत

उद्धव ठाकरे, अजित पवार भेटीने राजकीय चर्चांना उत

माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे आमदार असलेले उद्धव ठाकरे हे राज्यात सत्तान्तर झाल्यापासून अधिवेशनात फारसे फिरकत नाहीत. पण आज (१९ जुलै) विधानभवनातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात जाऊन उपमुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि अन्य शिवसेना नेते यावेळी उपस्थित होते. ही भेट नक्की कशासाठी होती, याचे तपशील अद्याप उपलब्ध झाले नसले तरी ठाकरे पवार यांच्या पवार भेटीने राजकीय चर्चाना आता उत आला आहे. ‘अजित पवार यांच्याशी चांगले संबंध आहे. विधान भवनात आल्याने त्यांची भेट घेतली, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

दरम्यान, महा विकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तर अजित पवार हे याच मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. या दोघांमध्ये कधीही विसंवाद झाल्याचे पहायला मिळाले नाही. करोंना काळात उद्धव ठाकरे घरातून सरकार चालवत असताना, अजित पवार मात्र सकाळी आठ वाजता आपल्या कार्यालयात हजर राहून कामे करत होते. महाविकास आघाडीने सध्याच्या सरकारविरोधात विरोधात राज्यातील विविध जिल्ह्यात घेतलेल्या सभेतही अजित पवार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर स्टेजवर बसलेले अनेकांनी पहिले होते. अजित पवार यांनी महावीकस आघाडीत असताना शिवसेना संपवायला घेतली. पण उद्धव ठाकरे यांचे त्याकडे लक्ष नव्हते, असा आरोप एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदार मंडळींनी केला. शिवाय, अजित पवार अर्थमंत्री असताना त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना विकास निधीची खिरापत वाटली, असा आरोप शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी केला होता.

हे सुद्धा वाचा:

राज्यात पावसाची जोरदार हजेरी; रायगडसह पालघर, पुणे, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट

ट्रिपल महाराष्ट्र केसरी ACP विजय चौधरी कॅनडाच्या आखाड्यात दाखवणार जलवा

एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पवार, पटेल शरद पवारांचे मन वळवत होते

अजित पवार यांनी 2 जुलै रोजी 9 आमदार सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले होते. नंतर त्यांच्यासह आलेल्या आमदारांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. नंतर त्यांना मलाईदार खाते वाटप करण्यात आले. अजित पवार आणि शरद पवार यांचा गट सध्याच्या राजकारणात सक्रिय आहे. त्यातच या दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत. पण उद्धव ठाकरे अजित पवार यांच्याबाबत कधीही वाईट बोलल्याचे समजत नाही. त्यांच्यात एक अन्डरस्टँडिंग आहे, ही बाब पळून राहिलेली नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी