25 C
Mumbai
Monday, February 26, 2024
HomeराजकीयVEDIO : सरकार जोमात, शेतकरी कोमात ; विरोधकांची सरकारविरोधात विधानभवनात घोषणाबाजी

VEDIO : सरकार जोमात, शेतकरी कोमात ; विरोधकांची सरकारविरोधात विधानभवनात घोषणाबाजी

कांद्यांची निर्यातबंदी करण्यात आल्यामुळे बाजारपेठेत कांद्याची आवक प्रचंड वाढली आहे. त्यामुळे कांद्याला उठाव मिळताना दिसत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. या मुद्द्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाने सरकारच्या धोरणावर टीका केली असून सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. शेतात घाम गळणाऱ्या शेतकऱ्यांची मुजोर व्यापारी कशी नागवणूक करतात याबाबतचा किस्सा अलीकडेच उघडकीस आला आहे. एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने ५०० किलो कांदा विकल्यानंतर त्याचा उत्पादन खर्च निघून केवळ २००० हजार रुपये व्यापाऱ्याने त्याच्या हातावर टेकवून त्याची बोळवण केली. राज्यात सर्वत्रच असे प्रकार घडत आहेत. मात्र, शेतकऱ्यांचे आपणच कैवारी असल्याचे ढोंग करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारला अद्यापही जाग आलेली दिसत नाही. या सरकारचा विरोधकांनी विधानभवनाच्या दारात धिक्कार केला. (Opposition raised slogans against the government in VIdhanbhavan)

पहा VEDIO :

सरकारच्या निष्क्रियतेबाबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. त्याचेच पडसाद आज विधानभवनातही उमटल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या आमदारांनी कांदा आणि लसणाच्या माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख यांच्यासह विरोधी पक्षाचे सर्व आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून सरकार विरोधात घोषणा देत होते. ‘द्राक्षाला भाव मिळालाच पाहिजे’, ‘सोयाबीनला भाव मिळालाच पाहिजे’, ‘कांद्याला भाव मिळालाच पाहिजे’, ‘शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘जाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘सरकार सरकार जोमात जोमात, शेतकरी बांधव कोमात कोमात’, अशा घोषणांनी विरोधकांनी विधिमंडळाचा परिसर दणाणून सोडला.

हे सुद्धा वाचा

तमासगीर गोपीचंद पडळकर, लाज वाटली पाहिजे ; अरविंद सावंताची जहरी टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सर्व फुटीर आमदार अपात्र ठरणार?

दारूवाल्यांवर माविआ सरकारची खैरात, फाईल ओपन होणार ; आशिष शेलार यांचा इशारा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी