27 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeराजकीयतमासगीर गोपीचंद पडळकर, लाज वाटली पाहिजे ; अरविंद सावंताची जहरी टीका

तमासगीर गोपीचंद पडळकर, लाज वाटली पाहिजे ; अरविंद सावंताची जहरी टीका

भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा ‘सेवाशक्ती संघर्ष संघटने’चे नेते गोपीचंद पडळकर आणि ‘एसटी’ कामगार संघाने आपल्या १६ मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी २८ फेब्रुवारीसापासून आझाद मैदानावर आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र, ‘एसटी’ महामंडळाने हे आंदोलन केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ‘एसटी’ कर्मचाऱ्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेबाबत शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी संशय व्यक्त केला असून पडळकर ‘तमासगीर’ आहे, लाज वाटली पाहिजे अशा बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. (Tamasgir Gopichand Padalkar, you should be ashamed)

नागपूर येथे अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सावंत यांनी गोपीचंद पडळकर यांचा ‘तमासगीर’ असा उल्लेख केला. ते म्हणाले, “गोपीचंद पडळकर तमासगीर आहे. लाज वाटली पाहिजे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी तमाशा केला. टाळ काय वाजवतायत? बोलतायत काय? तेव्हा मागणी केली होती की ‘एसटी’ महामंडळ शासनात विलीन करा. आता ते का गप्प आहेत? कारण पगार देता येत नाही.” ‘दिवाकर रावते आणि अनिल परब यांनी एसटी महामंडळाच्या आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक निधी आणल्याचे सावंत म्हणाले. उद्धव ठाकरेंनी महिन्याला ३६० कोटी रुपये महामंडळाला द्यायचा निर्णय घेतला. हजार कोटी रुपये तर एका वेळी अनिल परब यांनी आणले. मग ही कोण माणसं निर्माण झाली ज्यांचा काहीच संबंध नाही?,असा टोला सावंत यांनी लगावला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांच्या राजकीय कारकिर्दीत एसटी कामगारांचा प्रश्न गंभीर बनला होता. सरकारी कर्मचारी म्हणून सेवाशर्तींचा लाभ मिळावा, महामंडळाला सरकारमध्ये विलीन करावं, अशा मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळ संप पुकारला होता. यानंतर सरकारने मध्यस्थी करून वेतनवाढ, वेतनहमी दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

दारूवाल्यांवर माविआ सरकारची खैरात, फाईल ओपन होणार ; आशिष शेलार यांचा इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सर्व फुटीर आमदार अपात्र ठरणार?

‘महाशक्ति’ने पुण्याचा केला बिहार; धंगेकरांना विजयापासून रोखण्यासाठी पोलिस-सरकारी यंत्रणेचा गैरवापर; मीडियाची अळीमिळी-गुपचिळी!

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी