29 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
HomeराजकीयPolitics News : उद्धव ठाकरेंच्या पठ्ठ्याचे नारायण राणेंना आव्हान

Politics News : उद्धव ठाकरेंच्या पठ्ठ्याचे नारायण राणेंना आव्हान

शिवसेनेमधून विजयी झालेल्या अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिलेली असली तरी आमदार वैभव नाईक हे आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. वैभव नाईक यांनी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून थेट नारायण राणे आणि त्यांचा मुलगा निलेश राणे याला आव्हान दिले आहे.

राजकारण म्हंटल आणि त्यात कोकणातील राजकारणाचा विषय आला नाही असे होणे अशक्य आहे. पण कोकणचे राजकारण हे राणे कुटुंबीयांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही हे देखील तितकेच खरे आहे. आता पुन्हा एकदा कोकणातील राजकारणाचा विषय तापणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे. कारण विषयही तसाच आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कोकणातील एका पठ्ठ्याने थेट राणे कुटुंबियांना आव्हान दिले आहे. हा पठ्ठा दुसरा तिसरा कोणी नसून कोकणातील कुडाळ विधानसभेचे आमदार वैभव नाईक आहे. शिवसेनेमधून विजयी झालेल्या अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिलेली असली तरी आमदार वैभव नाईक हे आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. वैभव नाईक यांनी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून थेट नारायण राणे आणि त्यांचा मुलगा निलेश राणे याला आव्हान दिले आहे.

राणे कुटुंबीय विरुद्ध वैभव नाईक हे कोकणातील राजकारणाचं समीकरण सर्वांनाच माहित आहे. नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे हे कायमच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत असतात आणि त्याचमुळे कि काय पण आता थेट आमदार वैभव नाईक यांनी निलेश राणे यांना २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात उभे राहण्याचे आव्हान केले आहे.

याबाबतचे एक ट्विट देखील वैभव नाईक यांनी केले आहे. ‘हिम्मत असेल तर…, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे यांनी माझ्या विरुद्ध निवडणूक लढवूनच दाखवावी. यापूर्वी नारायण राणेंना पराभुत केले आहे. जर तुम्ही खरे राणे असाल तर माझ्या समोर येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जा.’ असे ट्विट करत वैभव नाईक यांनी राणे कुटुंबियांना सामोरे जाण्याचा इशारा केला आहे.

दरम्यान, याव्यतिरिक्त वैभव नाईक यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना राणे कुटुंबियांना चांगलेच सुनावले आहे. निलेश राणे आणि त्यांच्या कुटुंबियांना माहितीये की, नारायण राणे यांनी दबावाखाली किती पक्ष बदलले. शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजपचं सरकार आहे तर आता भाजपमध्ये आहेत. उद्या आणखी दुसरं सरकार आलं तर ते तिकडं जातील. मात्र, आम्ही कुणाचेही मिंधे नाहीये, असे म्हणत वैभव नाईक यांनी राणे कुटुंबियांवर शब्दांचे वार देखील केले आहेत.

Lay Bhari Diwali Magzine : ‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन

Gajanan Kale on Uddhav Thackeray : मनसेच्या गजानन काळेंना उद्धव ठाकरेंची पाठ सोडवेना

Uddhav Thackeray : संभाजीनगरमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची उद्धव ठाकरेंनी घेतली भेट

पण २०२४ च्या निवडणुकीत निलेश राणे यांची माझ्यासमोर निवडणुकीत उभे राहण्याची हिंमत होणार नाही कारण आधीच मी त्यांच्या वडिलांना धूळ चारली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात देखील मतदार हे माझ्यासोबतच असतील असा विश्वास देखील यावेळी वैभव नाईक यांनी व्यक्त करून दाखवला आहे. दरम्यान, या सर्व गोष्टींवर आता निलेश राणे नेमके काय बोलतात ? हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी