पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेर घर, राज्याची सांस्कृतिक राजधानी(Vasant More vs Ravindra Dhangekar VS Murlidhar Mohol). अशा या पुणे लोकसभेमध्ये ६ मतदार संघ आहेत. त्या मतदार संघानुसार तिथले आमदार कोण आहेत ते आपण पाहुयात- वडगाव शेरी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) गटाचे सुनील टिंगरे, शिवाजीनगर येथे भाजपचे सिद्धार्थ शिरोळे, कोथरूड मध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील , पर्वती मध्येही भाजपच्या माधुरी मिसाळ , पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये हि पुन्हा भाजपचे सुनील कांबळे तर कसबा मध्ये काँग्रेसचे धंगेकर . या नुसार पुण्यात जरी भाजपचे एकूण चित्र सध्या दिसत असले तरी हुशार पुणेकर निवडणुकीत हे चित्र बदलणार हे नक्की. सुरुवातीला हि लढत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात होणार असल्याने त्या दिशेने चर्चा होत असतांनाच वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांची उमेदवारी जाहीर केली. कात्रज हा बालेकिल्ला असलेले वसंत मोरे त्यांच्या कामकरण्याच्या पध्दत्तीमुळे, सोशल मीडियामुळे चांगलेच लोकप्रिय आहेत. केवळ लोकसभा निवडणुकीत उभं राहता यावं म्हणून त्यांनी मनसे सोडली खरी पण समोर धंगेकर आणि मोहोळाचं आव्हान असतांना मोरेंच्या बाजूने काय निकाल लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी तसंच सध्या भाजपच्या बाजूने पुण्यात चित्र दिसत असलं तरी धंगेकरांचं मोठं आव्हान मोरे आणि मोहोळांसाठी असणार आहे.
मोहोळ हे पुण्यातील सेलिब्रिटी आहेत . पुण्याचे महापौर असताना पूर्ण पुण्याने त्यांना स्वीकारलेलं होतं , कोरोनामध्ये त्यांनी केलेल्या कामाचीही पुणेकरांकडून दखल घेण्यात आली, शिवाय सोशल मीडियावर त्यांचं ऍक्टिव्ह असणं त्यांना तरुणांमध्ये चांगलंच लोकप्रिय करत आहे.
धंगेकर आणि मोरे दोघेही आधी मनसैनिक होते. त्यानंतर धंगेकर काँग्रेस मध्ये गेले नि आता मोरे वंचित बहुजन आघाडीमध्ये. ” जो आमदार कसब्याचा, तोच खासदार पुण्याचा ”, असं वक्तव्य मागे धंगेकरांनी केलेलं.. धंगेकरांनी आपल्या कामातून पुणेकरांना दिलेला विश्वास हा निकाल त्यांच्या बाजूनेही देऊ शकतो, हि उमेदवारी जाहीर करताना मोहन जोशींनी धंगेकरांना दिलेला पाठींबा बरंच काही सांगून जातो.
कात्रज बालेकिल्ला असलेल्या वसंत मोरेंना तिथले वंचित बहुजन ला पाठींबा देणारे आणि मुस्लिम बांधव साथ नक्कीच देऊ शकतात. नुकतेच वंचित बहुजन आघाडीला एम आए एम पाठींबा देणार असल्याचं वक्तव ओवेसींनी एका सभेत केलं, त्यामुळे मोरेंच्या बाजूनेही मोठा मतदार गट असणार आहे.
अशा परिस्थिती पुणेकर मोहोळ ,धंगेकर कि मोरे कोणाला निवडणार ……. याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे.
मोरे विरुद्ध धंगेकर विरुद्ध मोहोळ….. कोणता पॅटर्न पुणे लोकसभा गाजवणार
पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेर घर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अशा या पुणे लोकसभेमध्ये ६ मतदार संघ आहेत. त्या मतदार संघानुसार तिथले आमदार कोण आहेत ते आपण पाहुयात- वडगाव शेरी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) गटाचे सुनील टिंगरे, शिवाजीनगर येथे भाजपचे सिद्धार्थ शिरोळे, कोथरूड मध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील , पर्वती मध्येही भाजपच्या माधुरी मिसाळ , पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये हि पुन्हा भाजपचे सुनील कांबळे तर कसबा मध्ये काँग्रेसचे धंगेकर