30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमहसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन...

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन पार पडले

टीम लय भारी

रायगड:- रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात १० व्या अखिल भारतील मराठी संत साहित्य संमेलनाला  शनिवारी (दि. २२ जानेवारी) सुरुवात झाली. या दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करुन या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. २२ आणि २३ जानेवारी, असे दोन दिवस हे साहित्य संमेलन चालणार आहे.(Minister Balasaheb Thorat Marathi Sant Sahitya Sammelan was held in the presence)

संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी संप्रदायाच्या दिंडी या संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी आल्या आहेत. ज्ञानोबा तुकारामचा गजर करत टाळ आणी मृदुंगाच्या ठेक्यावर नाचत संत साहित्याची दिंडी काढण्यात आली.आमदार महेद्रं थोरवे याच्या हस्ते साहित्य दिडीं शुभांरभ झाला. या संमेलनाचे उद्घाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मोठ्या भक्तीभावाने झाले  यावेळी मंत्री थोरात यांना व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांना तुळशीच्या माळा घालून सन्मान करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

संत साहित्य संमेलन उद्यापासून रायगडमध्ये

राज्यात लवकरच वाळू स्वस्तात उपलब्ध होणार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

महर्षी गणपतराव साठे जीवन गौरव पुरस्कार राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांना जाहीर

Maharashtra Minister Balasaheb Thorat tests positive for COVID-19

कोरोनाचे नियम पाळून संमेलनाला सुरुवात – खालापूर तालुक्याला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. खालापूर येथे पहिल्यांदाच वारकरी साहित्य परिषद होत आहे. दि. २२ व २३ जानेवारी रोजी खालापूर तालुक्यातील देवन्हावे अखिल भारतीय वारकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून कोरोना नियमांचे पालन करुन कार्यक्रमाचे आयोजन अगदी कमी उपस्थितीत दोन दिवसांचे केले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

सांगता समारोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पाटोले यांच्या उपस्थितीत होणार असुन पालकमंत्री अदिती तटकरे हे या परिषदेचे स्वागताध्यक्ष आहेत. तसेच जेष्ठ पत्रकार जब्बार पटेल व श्यामसुदंर सोनार यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. वारकरी सप्रंदायचे अध्यक्ष विठ्ठल पाटील (काकाजी) व सचिन सदांनद मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी कोरोनाच्या नियमांना अधिन राहुन कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता मेहनत घेत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी