दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal ) यांना 22 मार्च रोजी अटक करण्यात आली. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांवर अटकेची कारवाई करण्यात आलीय. ईडीच्या अटकेत असलेल्या केजरीवाल यांना शुक्रवारी राऊस अव्हेन्यू कोर्टाने 6 दिवसांची अर्थात 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी ठोठावली आहे. केजरीवाल यांनी बीआरएसच्या नेत्या के. कविता, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह मद्य धोरण घोटाळ्याचे कारस्थान रचल्याचा ईडीचा आरोप आहे. यासर्व घडामोडींनंतर आम आदमी पक्षानं पत्रकार परिषद घेत अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमागची इनसाईड स्टोरी सांगितली आहे.(why Arvind Kejriwal was arrested Inside story )
आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या आतिषी यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत आतिशी यांनी संपूर्ण घटनेची माहिती देत केजरीवालांच्या अटकेमागं कोणती व्यक्ती आहे याचा खुलासा केला आहे.
काय म्हणाल्या प्रवक्त्या आतिषी ?
पत्रकार परिषदेत कथित घोटाळ्यात जर आर्थिक गैरव्यवहार झाला असेल किंवा पैशांची देवाण-घेवाण झाली असेल तर हा पैसा कुठे आहे? असा सवाल प्रवक्त्या आतिषी यांनी उपस्थित केला. दिल्लीच्या तथाकथित मद्य घोटाळ्यात दोन वर्षापासून सीबीआय आणि ईडीकडून चौकशी सुरु आहे. या काळात वारंवार कनिष्ठ न्यायालय, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात हा प्रश्न उपस्थित झाला आहे की पैसा नेमका गेला कुठे? असंही म्हटलं गेलं की दारुच्या व्यापाऱ्यांना मोठा फायदा झाला पण जर हा फायदा झाला असेल तर त्यांनी कोणाला लाच दिली.
केजरीवाल यांच्या अटकेनंतर पत्नी सुनीता यांचे ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाल्या….
शेकडो छाप्यांनंतर, हजारो लोकांच्या चौकशीनंतर तसेच आम आदमी पार्टीचा कोणताही नेता, मंत्री, कार्यकर्त्याकडून या गुन्ह्यातील एक रुपयाही मिळालेला नाही. सुप्रीम कोर्टानंही वारंवार हा प्रश्न उपस्थित केला आहे.
केजरीवाल यांच्यावर ही कारवाई केवळ एकाच व्यक्तीच्या विधानावर झालेली आहे. ही व्यक्ती आहे शरदचंद्र रेड्डी. अरोबिंदू फार्मा या औषध बनवणाऱ्या कंपनीचे रेड्डी हे मालक आहेत. यांच्याकडं इतरही काही कंपन्या आहेत. त्यापैकी दोन महत्वाच्या कंपन्या आहेत, एटीएल हेल्थकेअर, युजीआय फार्मा.
केजरीवाल जेलमधूनच सरकार चालवणार? कायदा काय सांगतो?
रेड्डींना दिल्लीच्या अबकारी धोरणात दारुची काही दुकानं मिळाली, काही झोन मिळाले. चौकशी यंत्रणांनी त्यांची ९ नोव्हेंबर २०२२ रोजी चौकशीसाठी बोलावलं यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, मी कधीही केजरीवालांना भेटलो नाही, त्यांच्याशी कधीही चर्चा झाली नाही. तसेच आपशी माझा कुठलाही संबंध नाही.
माझे जीवन…, अटकेनंतर अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी ईडीनं अटक केली. अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्यांनी आपलं स्टेटमेंट बदललं आणि त्यांनी सांगितलं की, मी केजरीवालांना भेटलो, माझी त्यांच्याशी मद्य घोटाळ्यात चर्चाही झाली त्यानंतर लगेचच रेड्डी यांना जामिनही मिळला. अशी माहिती देत पण या घोटाळ्यातील पैसा कुठे आहे? असा सवाल प्रवक्त्या आतिषी यांनी केला.
#WATCH | Delhi excise policy matter | Delhi Minister Atishi says, "In the so-called excise policy scam of Delhi, CBI and ED investigations have been going on for the past two years. In these two years, a question has come up again and again – Where is the money trail? Where did… pic.twitter.com/gPkhhfuZEB
— ANI (@ANI) March 23, 2024