33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमराठी भाषेच्या संवर्धनांसाठी लोकसहभाग हवाच : सुभाष देसाई

मराठी भाषेच्या संवर्धनांसाठी लोकसहभाग हवाच : सुभाष देसाई

टीम लय भारी

मुंबई : मराठी भाषा विभागातंर्गत असलेल्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या उपस्थितीत पार पडली. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार आणि संवर्धनाबाबत यावेळी सांगोपांग चर्चा करण्यात आली.राज्य मराठी विकास संस्थेच्या सदस्यांची ०३ नोव्हेंबर रोजी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आज सर्व सदस्यांची बैठक पार पडली. यावेळी सुभाष देसाई म्हणाले की, मराठी भाषा विभागाने मागील दोन वर्षांत अनेक चांगले उपक्रम राबविले. मराठी भाषेचे संवर्धन अधिक चांगल्या प्रकारे कसे करता येईल, यासाठी विशेष प्रयत्न केले. (Subhash Desai said Public participation is required for the promotion of Marathi language)

यामध्ये सर्व भाषांच्या शाळांमध्ये मराठीची सक्ती, दुकानांवरील मराठी भाषेतील पाट्यांचा कायदा केला. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात मराठीचा वापर प्रभावीपणे व्हावा, यासाठी देखील कायदा केला. दरम्यान, आगामी काळात दैनंदिन कारभारात मराठी भाषेचा वापर करण्यासाठी सर्व नगरपालिका आणि महामंडळ प्राधिकरणात कार्यशाळा घेतली जाईल. याशिवाय दुकानांच्या पाट्यांचे निरिक्षण करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देसाई म्हणाले.

मराठीचे संवर्धन करणाऱ्यांना आपण जोडून घेतले पाहीजे. मुंबई आणि तंजावर या शहरातील सांस्कृतिक आणि भाषिक देवाण-घेवाण झाली पाहीजे. मराठी भाषा विभागाचे उपक्रम जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियतकालिक प्रकाशित करण्यास सुरुवात करावी लागणार आहे. महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्यांना याद्वारे सर्व माहिती उपलब्ध होईल, असे देसाई (Subhash Desai) यांनी स्पष्ट केले.

या वर्षी मराठी भाषा भवनचे स्वप्न पूर्ण होत आहे. गुढीपाडव्याला त्याचे भूमिपूजन झाले आहे. सर्वांना अभिमान वाटेल, असे भव्य भाषा भवन उभे राहणार आहे. मराठी भाषेचा प्राचीन, मध्यमयुगीन आणि स्वातंत्र्यत्तोर काळातील मराठीचा प्रवास आदींचे दर्शन यातून घडणार आहे. त्यासाठी अभ्यासकांची समिती नियुक्ती केली जाणार आहे.

यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी सध्या राबवत असलेल्या व आगामी उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे ऑडिओ बूक तयार होत आहे. ११० तासांचे ऑडिओ बूक असेल. लवकरच त्याचा लोकापर्ण सोहळा पार पडेल. याशिवाय जगभरातील मराठी भाषिकांसाठी मराठीला ग्लोबल स्वरुप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सीमावर्ती भागातील मराठीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रयत्न करणे. सीमावर्ती भाषा आगामी काळात काय उपक्रम राबवायचे याचे नियोजन केले जाईल. पाणीनी ग्रथांचे मराठीकरण केले जाणार आहे. डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या जीवनावर लघुपट तयार करण्यात येणार आहे. पुस्तकांचे गाव योजना राज्यभर राबविण्यात येणार आहे.दरम्यान, आगामी काळात बाल विश्वकोशची निर्मिती करण्याचा विभागाचा मानस असल्याचे डॉ. राजा दीक्षित यांनी स्पष्ट केले.


हे सुद्धा वाचा :

भारतातील कारागिरांच्या परंपरागत डिजाईन आणि कलाकारीचा कोणालाही मुकाबला करता येणार : सुभाष देसाई

आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या व्हीजनमुळे महाराष्ट्र प्रगतीकडे घोडदौड करत आहे : सुभाष देसाई

उद्योग विकासासाठी महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही : सुभाष देसाई

स्वतःवर आरोप झाले की सामोरं जायचं नाही हे शूरपणाचे लक्षण नाही – गृहमंत्री

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी