29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराजेंद्र यड्रावकरांचे समर्थक आणि शिवसैनिक आपापसात भिडले

राजेंद्र यड्रावकरांचे समर्थक आणि शिवसैनिक आपापसात भिडले

टीम लय भारी

कोल्हापूर : शिरोळ विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या विरोधात आणि समर्थनात अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे शिवसेनेचे आणि राजेंद्र यड्रावकरांचे असंख्य कार्यकर्ते जमले. त्यामुळे कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांच्या जमावानंतर जयसिंगपूर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकरांनी अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. यावेळी शिवसेनेने त्यांना पाठिंबा देत आघाडी सरकारमध्ये घेऊन मंत्रीपद दिले. पण आता यड्रावकरांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन देत ते पहिल्या दिवसापासून शिंदे यांच्यासोबत आहेत. परंतु त्यांच्या या निर्णयामुळे शिवसैनिक चांगलेच नाराज झालेले आहेत. ज्या पक्षाने तुम्हाला मंत्री बनवले, त्यांच्याविरोधातच बंडखोरी करताना कसे काही वाटले नाही, असे मत शिवसैनिकांनी व्यक्त केले आहे.

जयसिंगपूर येथे सकाळी यड्रावकरांच्या समर्थकांनी मोर्चा काढला होता. राजेंद्र पाटील यड्रावकर हे त्यांच्या विकासकामांमुळे अपक्ष उभे राहून पण निवडून आले. असे यड्रावकरांच्या समर्थकांकडून यावेळी सांगण्यात आले. ‘साहेब, आम्ही तुमच्या सोबत आहोत.’ अशा आशयाचे पोस्टर समर्थकांकडून झळकविण्यात आले. त्यामुळे यड्रावकर यांच्या समर्थकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर शक्ती प्रदर्शन केले. यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

तर यड्रावकरांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांच्याविरोधात कोल्हापुरातील शिवसैनिक हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत. यड्रावकरांच्या समर्थकांच्या शक्ती प्रदर्शनानंतर शिवसैनिकांनी आंदोलन सुरु केले. जयसिंगपूर येथील त्यांच्या कार्यालयाच्या दिशेने शिवसैनिक कूच करण्याआधीच त्यांच्या कार्यालयाच्या बाहेरील १०० मीटर परिसरात पोलिसांनी बॅरिकेट्स लावले. असंख्य शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याने याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढविण्यात आला.

शिवसैनिकांनी यावेळी राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे कार्यालयाच्या जवळ असलेला दिशादर्शक बोर्ड देखील तोडला. आक्रमक शिवसैनिक आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट देखील झाली. तर विरुद्ध बाजूला असलेले यड्रावकर समर्थक हे सुद्धा शिवसैनिकांच्या दिशेने येऊ लागल्याने जयसिंगपुरात तणावपूर्ण वातावरण तयार झालेले होते.

‘उद्धव साहेब, आम्ही शिवसैनिक तुमच्या सोबत आहोत.’ असे पोस्टर यावेळी शिवसैनिकांनी याठिकाणी झळकावले. दरम्यान, या घटनेमुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिसांचा फौजफाटा तैनात करून सुद्धा आक्रमक शिवसैनिकांकडून त्याठिकाणचे बॅरिकेट्स तोडण्यात आले.

हे सुद्धा वाचा :

उद्धव ठाकरे यांना एका आंबेडकरवाद्याचे पत्र !

शिवसेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात जाण्याची शक्यता

नेते पंचतारांकित हॉटेलमध्ये; तर समर्थक रस्त्यावर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी