23 C
Mumbai
Thursday, February 15, 2024
Homeमहाराष्ट्रग्रह फिरले : अदानींना दिलेल्या कर्जाची आकडेवारी सादर करा; आरबीआईचे बँकांना निर्देश

ग्रह फिरले : अदानींना दिलेल्या कर्जाची आकडेवारी सादर करा; आरबीआईचे बँकांना निर्देश

हिडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानींच्या व्यायसायिक साम्राज्याला उतरती कळा लागली असून त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतींनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाडके उद्योगपती असलेल्या अदानींच्या कथित घोटाळ्यावरून इतकी उलथापालथ झाल्यानंतरही सरकारतर्फे कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. सरकारच्या या मौनव्रतावरून विरोधकांनीही बुधवारी अर्थसंकल्प सादर करतेवेळी संसदेत गदारोळ केला. मात्र, सरकारने यावर अद्यापही कोणतीच भूमिका घेतलेली नाही. शेअर बाजारातील पडझडीनंतर ‘अदानी इंटरप्राइझेस लिमिटेड’ने गुंतवणूकदारांच्या हिताचा मुद्दा पुढे करत शेअर बाजारातील ‘एफपीओ’ मागे घेतला. या सर्व घडामोडीनंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला जाग आली असून अदानी समूहाला कोणकोणत्या बँकांनी किती कर्ज दिले आहे, त्या कर्जाची आकडेवारी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Submit data on loans to Adani; RBI Instructions to Banks)

अदानी समूहाच्या कथित घोटाळ्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. गुरुवारी या मुद्द्यावरून विरोधकांनी संसदेत केंद्र सरकारला धारेवर धरले. विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे संसदेतील कामकाज तहकूब करावे लागले. अदानी समूहाच्या या कथित घोटाळ्याची रीतसर चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर आरबीआयने आता अडवाणींना दिलेल्या कर्जाचे तपशील संबंधित बँकांकडून मागितले आहेत. त्यामुळे अदानींच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • गुतंवणूकदारांच्या हिताला प्राधान्य
    गौतम अदानी यांनी गुंतवणूकदारांच्या हिताला प्रधान्य देत असल्याचे म्हंटले आहे. ते म्हणाले, “यापुढेही दीर्घकाळ संपत्ती निर्माण करणे सुरूच राहणार असून आम्ही विकासावर लक्ष केंद्रित करणार आहोत. शेअर बाजार स्थिरावला की आम्ही आमच्या निर्णयांचा पुनर्विचार करू. आमचा प्रत्येक व्यवसाय जबाबदार पद्धतीने संपत्ती बनवण्यासाठी प्रयत्नशील राहील.”

अदानींनी प्रचंड गाजावाजा करत बाजारात दाखल केलेला एफपीओ मागे घेतल्यामुळे आधीच संभ्रमित पडलेला सामान्य गुंतवणूकदाराच्या मनात भीती निर्माण झाली. त्यामुळे गुंतवणूकदार आणि भागधारकांच्या मनातील शंकाकुशंका दूर करण्यासाठी कंपनीचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांनी एक ध्वनिचित्रफीत जरी केली आहे. यामध्ये त्यांनी भागधारकांच्या मनातील गोंधळ दार करण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओत त्यांनी म्हंटले आहे की, “आमच्या एफपीओला चांगला प्रतिसाद मिळूनही बुधवारी आम्ही ते एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं असेल. पण काल शेअर बाजारात निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती पाहाता आमच्या संचालक मंडळाला असं वाटलं की या एफपीओचे व्यवहार अशाच प्रकारे सुरू ठेवणं नैतिकतेला धरून राहणार नाही.”

हे सुद्धा वाचा

तरुणीला विवस्त्र करून विडिओ केला व्हायरल ; पुण्यातील घटना

बजेटमधली तुमच्या आमच्या कामाची बातमी : आता महिन्याला वाचू शकतील दहा हजार रुपये; कसे ते समजून घ्या …

अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका; संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी