32 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeटेक्नॉलॉजी'एसटी'च्या 100 ई-बस जूनअखेर मुंबई-पुणे मार्गावर धावणार

‘एसटी’च्या 100 ई-बस जूनअखेर मुंबई-पुणे मार्गावर धावणार

'एसटी'च्या ताफ्यात या आठवड्यात 15 ई-बसेस दाखल होणार आहेत. इलेक्ट्रिक बससाठी मुंबई-पुणे मार्गावर चार्जिंग स्टेशनच्या सुविधा उभारल्या जात आहेत. मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरी सेवा लोकप्रिय आहे. आता त्यात हा स्वस्तातील गारेगार ई-पर्याय उपलब्ध होणार आहे.

‘एसटी’च्या 100 ई-बस जूनअखेर मुंबई-पुणे मार्गावर धावणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एमएसआरटीसी अर्थात राज्य परिवहन, ‘एसटी’च्या ताफ्यात या आठवड्यात 15 ई-बसेस दाखल होणार आहेत. शिवाई ई-बस सेवा राज्यातील काही मार्गांवर लोकप्रिय ठरली आहे. आता मुंबई-पुणे या राज्यातील दोन महत्त्वाच्या महानगरांना जोडणाऱ्या, गर्दीच्या मार्गावर सुरू होत असलेल्या ई-बस सेवेने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या मार्गावरील शिवनेरी सेवा लोकप्रिय आहे. आता त्यात हा स्वस्तातील गारेगार ई-पर्याय उपलब्ध होणार आहे.

शाश्वत आणि पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने MSRTCने हे एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हरित भविष्याच्या दृष्टीकोनातून, राज्य परिवहन महामंडळाने आपल्या ताफ्यात अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस सामावून घेण्यासाठी देशातील आघाडीच्या ई वाहन उत्पादकांसोबत हातमिळवणी केली आहे. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होईल. याशिवाय, हा उपक्रम म्हणजे स्वच्छ ऊर्जेच्या पर्यायांना प्रोत्साहन देण्याच्या राज्य सरकारच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे.

जूनच्या अखेरीस मुंबई-पुणे मार्गावरील वाहतुकीसाठी एसटी ताफ्यात 100 इलेक्ट्रिक बसेसचे आगमन होईल. त्याच्या स्वागतासाठी महामंडळ सज्ज झाले आहे. पहिल्या टप्प्यात, या आठवड्यात 15 बसेस दाखल होणार आहेत. राज्यातील या दोन्ही महत्त्वाच्या, गजबजलेल्या शहरांमधील प्रवाशांना यामुळे सुखद व आरामदायी प्रवासाची सुविधा कमी खर्चात मिळू शकेल.

इलेक्ट्रिक बसेसमुळे कमी वायू प्रदूषण होते. याशिवाय, प्रवास तर आरामदायी प्रवास होईलच; पण एसटीच्या वाहतूक खर्चातही मोठी बचत होणार आहे. या इलेक्ट्रिक बसेसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि इको-फ्रेंडली वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी त्या एक आदर्श पर्याय बनतात.

 

केंद्र सरकारच्या इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्याच्या आणि देशव्यापी शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नाचा एक भाग म्हणून एसटीने हे पाऊल उचलले आहे. मुंबई-पुणे मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर इलेक्ट्रिक बसेस सुरू करून नंतर राज्यातील इतर शहरांना ई-प्रवासाने जोडण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

हे सुद्धा वाचा : 

एसटी कष्टकरी जनसंघ संघटनेची स्थापना, गुणरत्न सदावर्तेंची राजकारणात एन्ट्री

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन म्हणजे युद्धात जिंकले व तहात हारले अशीच अवस्था : श्रीरंग बरगे

बसमध्ये मोबाईल वापरला तर गुन्हा दाखल होणार; वाचा बेस्टचा नवा नियम

नव्या इलेक्ट्रिक बसेस एअर कंडिशनिंग, आरामदायी आसन व्यवस्था आणि सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहेत. अधिक कार्यक्षम बॅटरी प्रणालीमुळे या बस एका चार्जमध्ये जास्त अंतर कापू शकतात. त्यामुळे वारंवार रिचार्ज न करता लांब पल्ल्याचा प्रवास करू शकतात. यामुळे प्रवाशांना सुरळीत आणि अखंड प्रवासाचा अनुभव मिळेल.

इलेक्ट्रिक बससाठी मुंबई-पुणे मार्गावर चार्जिंग स्टेशनच्या सुविधा उभारल्या जात आहेत. या इलेक्ट्रिक बसेसच्या लाँचमुळे, मुंबई आणि पुणे दरम्यान अधिक पर्यावरणपूरक, अधिक आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा अनुभव घेता येऊ शकेल.

Mumbai Pune E Bus, Shivai E Bus, Mumbai Pune Shivai Bus, ST E Bus, MSRTC E Bus

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी