33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeएज्युकेशनराज्य सरकारकडून मेगा भरती; दीड हजार लिपिकांची पदे भरणार

राज्य सरकारकडून मेगा भरती; दीड हजार लिपिकांची पदे भरणार

लय भारी टीम

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात “एमपीएससी”च्या गट-क मधील लिपिक पदांच्या भरतीमध्ये लक्षणीय अशी वाढ असलेली जाहिरात शुद्धिपत्रकाद्वारे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. गट-क मधील लिपिक/टंकलेखक (मराठी) वर्गाकरिता तब्बल 1077 जागांची भरती करण्यात येणार आहे. ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेतील गट-क (MPSC Group-C Combine Exam 2021) मधील सर्वात मोठी भरती असल्याचे सांगितले जात आहे. याच संवर्गातील इंग्रजी लिपिकांसाठी देखील 102 जागांची भरती करण्यात येणार आहे. म्हणजे एकंदरीत यंदा लिपिक/टंकलेखक या पदासाठी तब्बल 1180 जागांची भरती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 21 डिसेंबर 2021 रोजी एकूण 900 जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जागा वाढविल्याने 45 पेक्षा अधिक गुण असणाऱ्या परीक्षार्थ्यांना हि सुवर्ण संधी असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या वाढीव संख्येमुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी मिळाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे परीक्षार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. विद्यार्थ्यांनी आंदोलने केली, तर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केल्या. पण यावर्षी गट-क वर्गातील कर्मचारी होण्याची संधी प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या बंपर भरतीमुळे अनेक एमपीएससी विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

सदर शुद्धपत्रिकेच्या जाहिरातीमध्ये उद्योग निरीक्षक पदाच्या 103 जागा, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 114 जागा, तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय पदासाठी 14 जागा आणि कर सहाय्यक पदाच्या 285 जागांची भरती प्रक्रिया देखील यावेळी राबविण्यात येणार आहे.

हे सुध्दा वाचा :

https://laybhari.in/modi-government-conspiracy-to-falsely-implicate/

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी