31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजकिराणा दुकानांत वाईन विक्री प्रकरणी अण्णा हजारे ठाकरे सरकारवर संतापले

किराणा दुकानांत वाईन विक्री प्रकरणी अण्णा हजारे ठाकरे सरकारवर संतापले

टीम लय भारी
अहमदनगर:- राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे  यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘हा निर्णय दुर्दैवी असून जर शेतकऱ्यांचे हित पहायचे असेल तर त्यांच्या पिकांना हमी भाव मिळवून द्यावा,’ असे हजारे यांनी म्हटले आहे. ‘वाईन म्हणजे दारू नाही’ या युक्तिवादाचाही त्यांनी समाचार घेतला आहे.(Anna Hazare angry the government  sale of wine in grocery stores)

राज्यातील जनतेसाठी  हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे असेच म्हणावे लागेल, असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे. एकीकडे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचे सांगत आहे. तसेच वाईन म्हणजे दारू नाही असेही सांगण्यात येत आहे. असे निर्णय या राज्याला कुठे घेऊन जाणार हा खरा प्रश्न असल्याची टीका अण्णा हजारेंनी केलीय.

हे सुद्धा वाचा

लवकरच किराणा दुकानात वाईन मिळणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

वाईन विक्रीवरुन गोपीचंद पडळकर यांचे सरकारवर टीकास्त्र

महाराष्ट्र सरकारने प्रति लिटर वाईनच्या बाटलीवर 10 रुपये नाममात्र अबकारी कर जाहीर केला आहे.

Maharashtra allows sale of wine in supermarkets, grocery shops

संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. असे असताना केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय घेण्यात येत असल्याचे पाहून दुःख होते. शेतकऱ्यांचेच हित पहायचे असेल तर गोरगरीब, सामान्य शेतकरी आपल्या शेतात जे पिकवतो त्याला राज्य आणि केंद्र सरकारने हमी भाव द्यायला हवा.

मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून अशा प्रकारे वाईनची खुल्या विक्रीला परवानगी दिली जात आहे. त्यातून एका वर्षात एक हजार कोटी लिटर वाईन विक्रीचे उद्दिष्ट ठेवणारे सरकार यातून नेमके काय साध्य करणार? हा खरा प्रश्न आहे, असेही हजारे यांनी म्हटले आहे.

“सरकारने घेतलेल्या वाइन विक्रीच्या निर्णयाचा राज्यातील जनता निषेध करीत आहे तर सरकारमधील लोक मात्र या निर्णयाचे समर्थन करीत आहेत. केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे करून देण्यासाठी सरकारने प्राधान्य देणे हे या राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी आहे,” असंही अण्णा हजारे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी