29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeटॉप न्यूज‘या’ आमदाराला कोरोनाची लागण

‘या’ आमदाराला कोरोनाची लागण

टीम लय भारी

अमरावती : नेत्यांनाही एकापाठोपाठ कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. खासदार नवनीत कौर राणा यांच्यापाठोपाठ त्यांचे पती आमदार रवी राणा यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राणा कुटुंबातील तब्बल बारा सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राणा दाम्पत्याच्या दोन लहान मुलांचाही समावेश आहे. त्याचबरोबर रवी राणा यांच्या आई-वडिलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. राणा कुटुंबावर सध्या नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्वांनी दक्षता घ्यावी आणि सुरक्षित राहावं असं आवाहन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या वतीने करण्यात येत आहे.

नवीन राणा यांची चार वर्षाची मुलगी, मुलगा, सासरे, सासू, नणंद, नणंदेचा नवरा आणि इतर अशा १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आई-वडिलांना कोरोनाची लागण झाल्याने रवी राणा हे त्यांना नागपूरला उपचारासाठी घेऊन गेले होते. तर त्यांच्या मुलांवर अमरावतीत उपचार सुरू असून नवनीत राणा या त्यांची देखभाल करत आहेत. मुलांची देखभाल करत असतानाच त्यांनाही ताप आणि खोकला येऊ लागला. करोना सदृश्य लक्षणे जाणवल्याने नवनीत यांनी कोरोनाची टेस्ट केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं.

नवनीत राणा यांनी याआधी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर आरोग्य कर्मचारी मुलाचा स्वॅब घेतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी त्यांनी, “हे प्रभू सर्वांना या कोरोनाच्या महामारीतून लवकर मुक्त कर, मी एक खासदार जरी असली तरी सोबतच आई सुध्दा आहे. आज माझा लहान मुलगा रणवीर याचे स्वाब घेताना ज्या पद्धतीने तो रडायला लागला हे पाहून आई म्हणून मलासुद्धा खूप वेदना झाल्या,” अशा भावना व्यक्त केल्या होत्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी