31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजनाशिकमध्ये भाजप नवनिर्वाचित प्रवक्ते अजित चव्हाण यांचे जंगी स्वागत!

नाशिकमध्ये भाजप नवनिर्वाचित प्रवक्ते अजित चव्हाण यांचे जंगी स्वागत!

टीम लय भारी

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस श्रीकांत भारतीय तसेच भाजपा महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अजित चव्हाण यांचे नाशिक येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाथर्डी फाटा येथे ढोल-ताशांच्या गजरात अगदी जोमात स्वागत करण्यात आले(BJP spokesperson Ajit Chavan’s warm welcome in Nashik!).

अभ्यासू वृत्तीचे धडाडीचे पत्रकार अजित चव्हाण यांनी भाजप प्रदेश प्रवक्तेपदी पदभार स्वीकारल्यानंतर आज नाशिकमध्ये पाथर्डी फाटा येथे ढोल ताशांच्या आणि फटाक्यांची आतिषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांच्या समवेत भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांनी या स्वागत सोहळ्याला आपली उपस्थिती दर्शवली. श्रीकांत भारतीय आणि राज्य प्रवक्ता अजित चव्हाण आमदार सीमा हिरे यांनी पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले व छत्रपती शिवाजी महाराज कि जय असा जयघोष करण्यात आला. यांनंतर स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह पहायला मिळाला.

यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार म्हणून अजित चव्हाण यांचे कार्य आम्ही पाहिले आहे. यामुळं भारतीय जनता पार्टीत त्यांनी प्रवेश करत पक्षाने त्यांना प्रवक्ते पदाची जबाबदारी दिल्यानं भारतीय जनता पार्टीला एक चाणक्य प्रवक्ता मिळाला आहे. त्यांचा पक्षाला मोठा फायदा होईल अशी प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. नाशिकरांनी केलेल्या या स्वागताचे श्रीकांत भारतीय आणि अजित चव्हाण यांनी आभार मानले.

हे सुद्धा वाचा

मुंबई महापालिकेने उंदीर मारण्यातही केला घोटाळा, प्रभाकर शिंदेंचा आरोप

शिवसेनेचा हेतू मला मारण्याचा होता,किरीट सोमय्यांचा धक्कादायक आरोप

संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

BJP terms Maharashtra’s demand invalid

यावेळी भाजप आमदार सीमा हिरे , नगरसेवक मुकेश शहाणे ,छाया देवांग , भगवान दोंदे , मंडळ अध्यक्ष शिवाजी बर्के , अविनाश पाटील, उदयोजक समीर चव्हाण, जगन अण्णा पाटील, हर्षा फिरोदिया , यशवंत नेरकर, रवी पाटील, राहुल गणोरे, करण शिंदे , अर्चना दिंडोरकर, अंकुश वऱ्हाडे , देवेंद्र पाटील स्थानिक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी