29 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeटॉप न्यूजBoycott : बॉयकॉट फॉर्म्युला पसरणार !

Boycott : बॉयकॉट फॉर्म्युला पसरणार !

टिम लय भारी : अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार

उचललेस तू मीठ मूठभर
साम्राज्याचा खचला पाया!

सन 1930 एक ध्येयवेड्या असलेल्या एका अवलियाने हातात चिमूटभर मीठ घेऊन (Boycott) आख्या ब्रिटिश साम्राज्याला धक्का दिला. ज्याच्या देशात कधी सूर्य मावळत नाही अशा सरंजामी मनोवृत्ती ला या अर्ध उघड्या वृद्धाने बहिष्काराचे अमोघ अस्त्र वापरून नामोहरम करून टाकले.

आणि हेच दृश्य सध्या नवी दिल्लीच्या सिंगु बॉर्डरवर नव्याने पाहावयास मिळत आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि देशातील विविध राज्यातून आलेल्या आणि कडाक्याच्या प्रचंड थंडी मध्येही असे असंख्य म्हातारे आपल्या शेतात काळ्या मातीत पिकलेले सोने हे माती मोल भावाने विकले जाऊ नये म्हणून आता गांधीजींच्या मार्गाने असहकार आणि बहिष्काराचे वाण घेऊन सज्ज झाले आहेत. आणि आता हे अस्त्र आहे #BoycotJio चे.

खरे तर मिठाचा सत्याग्रह आणि सिंगु च्या सीमेवर सुरू असलेला जिओ बहिष्कार याची थेट तुलना होऊ शकत नाही. पण यामध्ये एक समांतर धागा निश्चितच आहे. आणि तो म्हणजे एखाद्या वस्तूवर टाकण्यात येत असलेल्या बहिष्काराचा. गेली 17 दिवस हे लाखो शेतकरी आपल्या न्याय मागण्यांसाठी राजधानी च्या वेशीवर ठाण मांडून बसले आहेत. सुरुवातीला हे आंदोलन म्हणजे एक बुडबुडा असेल या भ्रमात असलेल्या केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. पण नंतर त्याची तीव्रता वाढू लागली तशी ‘ फोडा फोडीचे तंत्र अवलंबिले गेले. पण आपल्या कुटुंब कबिल्यासह आर पार ची लढाई करण्यासाठी आलेल्या या शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणे अशक्य झाले.

कोणतेही आंदोलन हे सनाम अथवा बदनाम करण्याची ट्रिक असते. त्याचाच एक प्रयोग इथे खलिस्तानी अतिरेक्यांशी जोडून करण्याचा विघातक प्रयत्न करण्यात आला. काहो अति विद्वाणांनी तर या आंदोलनाचा चीन आणि पाकिस्तानशी सबंध जोडण्याची वाचाळगिरी केली.

साम , दाम , भेद आणि दंड सर्व प्रयोग करूनही हे आंदोलन कर्ते अजिबात विचलित झाले नाहीत. हा नवीन कायदा उद्योगपती धार्जिना असून त्यामध्ये अंबानी आणि अदानी यांचे फावणार अशी चर्चा असल्याने आता सिंगु सीमेवरून बॉयकॉट जिओ चा नारा देण्यात आला आहे. आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दोन दिवसातच 15 लाखाहून अधिक लोकानी जिओ सर्व्हीस बंद अथवा अन्य सेवेकडे वर्ग केली. प्राप्त माहितीनुसार पंजाब , हरियाणा आणि उत्तर प्रदेश येथे आतापर्यंत 20 लाखाहून अधिक जिओ वापरकर्ते हे या बहिष्कार मध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी आपली जिओ सेवा बंद अथवा दुसरीकडे वळविली आहे. या छोट्या आकड्याने जिओ वर काहीही परिणाम होणार नाही असे सकृत दर्शनी दिसत असले तरी हो चिंगारी कधीही वणवा पेटवू शकते. सध्या उत्तर भारतात अंबानी आणि अदानी या उद्योगपती विरोधात मोठ्या प्रमाणात आवाज समाज माध्यमे आणि खासगीतून उठविण्यात येत आहे.

आंदोलन दिवसेंदिवस पेटत चालले असून हा बॉयकॉट फॉर्म्युला जोर धरत आहे.

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार
9820291629

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी