32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeटॉप न्यूजशिवजयंती साजरी करण्यास मुख्यमंत्री दिली मान्यता, 'या' अटींची करावी लागणार पुर्तता

शिवजयंती साजरी करण्यास मुख्यमंत्री दिली मान्यता, ‘या’ अटींची करावी लागणार पुर्तता

टीम लय भारी

मुंबई : गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे कोणताही सण, उत्सव हा नेहमीसारखा मोकळेपणाने साजरा करता आलेला नाही. कोरोनामुळे दोन वर्षातल्या प्रत्येक सण उत्सव, जयंतीवर काही ना काही निर्बंध राहिले आहेत. त्यामुळे किमान यंदा तरी शिवजयंतीसाठी निर्बंध शिथिल असावेत अशी लोकांच्या मागण्या आहेत(CM approves to celebrate Shiva Jayanti, conditions have to be fulfill).

यंदाची शिवजयंती धूमधडाक्यात पार पडणार आहे. तर शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हे पाहून मुख्यमंत्र्यांनी नवी नियमावली जारी केली आहे(This year’s Shiva Jayanti will be celebrated in a big way).

आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे(The CM has also appealed to abide by the health rules).

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री म्हणाले; ‘शाब्बास, दिल्लीत झेंडा फडकवलात’ !

धक्कादायक : मुख्यमंत्र्यांचे उपसचिव अनिष परशुरामे यांचे निधन

मनीषा कायंदेंचा भाजपवर घणाघात ,सत्ता गेली की माणसं बिथरतात

Uddhav Thackeray Taunts BJP Over Raj Bhawan Visits. He Says This

राज्यात दोन वेगवेगळ्या तारखांना शिवजयंती साजरी न करता ती एकाच दिवशी साजरी करण्यात यावी अशी मागणी आता शिवसेना आमदारांनी ठाकरे सरकारकडे केली आहे. शिवभक्त लोकांच्या मागणीचा विचार लक्षात घेऊन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता.

त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तर शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी