30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeटॉप न्यूजएकनाथ शिंदेंनी राजकीय सभेसाठी उधळले 10 कोटी, प्रकरण न्यायालयात!

एकनाथ शिंदेंनी राजकीय सभेसाठी उधळले 10 कोटी, प्रकरण न्यायालयात!

बीकेसी दसरा मेळावा एसटी बसेस बुकिंग खर्चप्रकरणी न्यायमूर्ती ए.एस. गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश डी. नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी. उद्धव ठाकरे सभा आटोपल्यानंतर वाचून दाखविले होते शिंदे यांनी भाषण.

एकनाथ शिंदेंनी राजकीय सभेसाठी उधळलेले 10 कोटी रुपयांचे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. बीकेसी दसरा मेळावा यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. (Eknath Shinde Dussehra Melava Expenses) एकीकडे शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे सभा झाली अन् दुसरीकडे शिंदे सेनेचा मेळावा पार पडला होता.

मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती ए.एस. गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश डी. नाईक यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी, 16 ऑक्टोबर रोजी प्रकरण सुनावणीसाठी आहे. एकनाथ शिंदे विरोधात रिट पीटिशन क्रमांक 4553/2022 असा आहे. दीपक दिलीप जगदेव यांची ही याचिका आहे. केस लिस्टनुसार, ही याचिका 23 व्या क्रमांकावर सुनावणीसाठी बोर्डावर आहे. एकनाथ शिंदे व इतर हे या याचिकेतील प्रतिवादी आहेत.

जगदेव यांनी ॲड. नितीन सातपुते सातपुते यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात ही रिट याचिका क्र. 17216/2022 दाखल केली आहे. बीकेसी दसरा मेळावा यासाठी 10 कोटी निधी हा अज्ञात स्त्रोतातून जमा करण्यात आला आहे. त्यासाठी मनी लाँडरिंग आणि आयकर कायद्याच्या कलम 68 अंतर्गत प्रतिवादी 1 – मुख्यमंत्री आणि इतरांविरुद्ध फौजदारी खटला (एफआयआर) दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. मागितला आहे. खरेतर राज्य परिवहन एसटी बसेस या राजकीय सभा मेळावे यासाठी उपलब्ध नसतात. मात्र, शिंदे सेनेच्या मेळाव्यासाठी बसेस दिल्या गेल्या. त्यामुळे एसटीवर अवलंबून असलेल्या राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांची गैरसोय झाली. या राज्य बसेसच्या बुकिंगसाठी निधी कुठून आला, त्या स्त्रोताची चौकशी करण्याचे निर्देश आयकर विभागाला द्यावे, अशी विनंती दीपक सचदेव यांनी याचिकेत केली आहे.

एकनाथ शिंदें यांनी बीकेसी मेळाव्यासाठी मुंबई शहर आणि परिसरातील सर्व डेकोरेटर्स (मंडप व सजावटवाले) बुक केले होते. शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील ऐतिहासिक दसरा मेळाव्याची कोंडी करण्याचाच तो एक भाग होता. मात्र, एव्हढे असूनही दसरा दणक्यात साजरा झाला होता तो शिवाजी पार्कवर, शिवसेनेचाच! उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर शिंदे यांनी बीकेसी मेळाव्यात सव्वा तासांचे कंटाळवाणे भाषण केले. त्यांनी रटाळपणे लिखित स्क्रिप्ट वाचून दाखविली. या मेळाव्यात शिंदे हे मोदी स्टाईलने ठाकरेंवर सर्जिकल स्ट्राईल करणार वैगेरे बातम्या मिंधे मीडियाने चालवल्या होत्या. मात्र हे सारे दावे फोल ठरले. त्यातच दीपक केसरकर यांना शिंदेंच्या भाषणातच डुलकी लागली. केसरकर यांच्याप्रमाणेच बोअर झालेले, जमविलेले अनेक लोकही सभेतून उठून जाताना दिसले होते.

हेही वाचा: :

शिंदे गटाचा कार्यकर्ता दसरा मेळाव्याला आला, पण;.

दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार; न्यायालयाचा मोठा निर्णय

सरा मेळाव्यात भाषणे कुणाची लांबली हे तुम्हाला माहितीये, अजित पवारांचा मिश्किल टोला

शिंदे गटाने बीकेसी येथील दसरा मेळाव्यासाठी एसटीच्या 1,800 बसेस बुक केल्या होत्या. याशिवाय तीन हजार खासगी लक्झरी ट्रॅव्हल्स बसेसही राज्यभरातून बुक केल्या गेल्या होत्या. एसटी बुकिंगसाठी दहा कोटी रुपये रोख भरण्यात आले होते. ही रोख रक्कम मोजायला एसटी विभागाला दोन दिवस लागल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. एसटी महामंडळाच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर बस गाड्यांचे आरक्षण केले गेल्याचेही सूत्रांनी “लय भारी”ला सांगितले.

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यापूर्वीच एसटी बसेस आरक्षणासाठी रोख दहा कोटी रुपये भरले गेल्याची आयकर व ईडी चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. भरणा रक्कम जर शिवसेनेच्या अधिकृत बँक खात्यातून अदा केली गेली नसेल, तर हा रोख व्यवहार कसा झाला? कुठल्या माध्यमातून झाला? या निधीचा स्त्रोत काय? हे सारे आयकर विभागाने शोधून काढावे, असे लोंढे यांनी म्हटले आहे.

Eknath Shinde Dussehra Melava Expenses, बीकेसी दसरा मेळावा, उद्धव ठाकरे सभा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी