30 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeटॉप न्यूजफरहान आझमीला अटकपूर्व जामीन, फसवणूक प्रकरणात तूर्तास दिलासा

फरहान आझमीला अटकपूर्व जामीन, फसवणूक प्रकरणात तूर्तास दिलासा

टीम लय भारी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकिया हिचा पती फरहान आझमी याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. फसवणुकीच्या एका प्रकरणात फरहानला मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. जुलै 2018 मध्ये फरहानचे एक्स-बिझनेस पार्टनर काशिफ खान यांनी फरहानच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती(Farhan Azmi granted pre-arrest bail).

13.5 लाख रुपयांना फसवणूक केल्याचा दावा तक्रारदार खान यांनी केला होता. मात्र फरहानला हायकोर्टाकडून तूर्तास अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. फरहान आझमी हा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमदार अबू आसिम आझमी (Abu Azmi) यांचा मुलगा आहे.

औरंगाबादेत धक्कादायक प्रकार: घर बुक करताना जात विचारली, वकिलानं ठोकला अ‍ॅट्रॉसिटीचा दावा!

आई मला माफ कर, सुसाईड नोट लिहित विवाहितेची आत्महत्या

हे आहे प्रकरण?

तक्रारदार काशिफ खान यांनी फरहान आझमीच्या विरोधात जुलै 2018 मध्ये फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणी आयपीसी कलम 420, 406 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरहानचे एक्स-बिझनेस पार्टनर काशिफ खान यांनी जुलै 2018 मध्ये फरहानने आपली 13.5 लाख रुपयांना फसवणूक केल्याचा आरोप केला होता.

न्यायमूर्ती एसवी कोतवाल यांनी फरहान आझमी याला या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. फरहान आझमीचे वकील अॅड सुजीत शेलार यांनी याविषयी माहिती दिली. त्यामुळे फरहानला तूर्तास अटकेपासून संरक्षण मिळाले आहे.

सुजित शेलार म्हणाले की, हा 13.5 लाख रुपयांचा दिवाणी वाद होता. जो लवादासमोरही प्रलंबित होता. 19 जून 2018 रोजी एफआयआर दाखल करण्यास 18 महिन्यांचा विलंब झाला होता. वांद्रे पोलिस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सरकारी वकिलांनी ही माहिती दिली. तपास जवळपास पूर्ण झाला आहे.

अभिनेते हेमंत बिरजेंचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात, पत्नीही जखमी

FPJ Legal: BJP leader’s wife approaches HC for pre-arrest bail for forging birth certificate for acquiring Indian passport

कोण आहे फरहान आझमी?

39 वर्षीय फरहान आझमी हा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमदार अबू आसिम आजमी यांचा पुत्र आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकिया हिचा पती आहे. 2009 मध्ये आयेशा आणि फरहान विवाहबद्ध झाले होते. आयेशा टाकियाची भूमिका असलेले टारझन – द वंडर कार, सोचा ना था, दिल मांगे मोअर, वाँटेड यासारखे अनेक चित्रपट गाजले आहेत.

फरहान आझमीने आपल्या करिअरची सुरुवात बिझनेसमन म्हणून केली होती. त्याच्या मालकीचे अनेक हॉस्पिटॅलिटी ब्रँड्स, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. तो मुंबई आणि गोव्यात कोयला, कॅफे बॅसिलिको, टीजीएल कंपनी, सिटीवॉक शूज, मद्रास डायरी, चायकॉफी आणि बॅसिलिको हाउस यांसारख्या शाकाहारी रेस्टॉरंटची मोठी चेन चालवतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी